२६ जानेवारीपासून राज्यात फास्ट टॅग अनिवार्य

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी फास्ट टॅग विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत; तर एमएसआरडीसीने निवडलेल्या बॅंकांतून फास्ट टॅगची विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून फास्ट टॅग लावण्यासाठी जनजागृती केली आहे.
Fastag Compulsory in State from Republic Day
Fastag Compulsory in State from Republic Day

मुंबई  : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारीपासून देशभरातील टोल नाक्‍यांवर फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. मात्र राज्यात फास्ट टॅगची अंमलबजावणी प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईचे प्रवेशद्वार; तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यात फास्ट टॅगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी फास्ट टॅग विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत; तर एमएसआरडीसीने निवडलेल्या बॅंकांतून फास्ट टॅगची विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून फास्ट टॅग लावण्यासाठी जनजागृती केली आहे. याशिवाय फास्ट टॅग विक्रीसाठी एमएसआरडीसीने पेटीएम, आयसीआयसीआय, आयडीएफसी या बॅंकांसह तब्बल 26 बॅंकांची निवड केली आहे. 

मुंबईतील सर्व प्रवेशद्वारावर 26 जानेवारीपासून फास्ट टॅग बंधनकारक आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर फास्ट टॅग विकण्यासाठी 30 केंद्र उभारण्यात आले आहे. सी-लिंकवर पाच केंद्र उभारण्यात आले आहे. अधिकृत बॅंकेकडून फास्ट टॅग विकत घेता येणार आहे. त्या बॅंकांमधूनच रिचार्जची सुविधा मिळणार आहे. छोट्या वाहनांना ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज करता येणार आहे; तर अवजड वाहनांना अधिकृती केंद्रात जावे लागणार आहे. शहरात पार्किंग स्थळे, मॉल या ठिकाणी फास्ट टॅग विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

रिपेमेंन्ट झाल्यास पैसे परत
टोल नाक्‍यांवर फास्ट टॅग लाईनमध्ये वाहनावरील फास्ट टॅग तांत्रिक कारणामूळे स्कॅन न झाल्यास अनेक वेळा वाहनचालकाकडून रोख रक्कम घेतले जाते; मात्र त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फास्ट टॅग अकाऊंटमधूनदेखील पैसे कापले जातात; मात्र ज्या बॅंकेचा फास्ट टॅग आहे, त्या बॅंकेला ई-मेलद्वारे तक्रार केल्यास ऑनलाईन पद्धतीनेच ते पैसे फास्ट टॅग अकाऊंट वाहनधारकांच्या खात्यात परत केले जाणार आहे.

फास्ट टॅग नसल्यास कारवाई
26 जानेवारीनंतर राज्यातील टोल प्लाझामधून केवळ फास्ट टॅग असलेल्या वाहनांनाच प्रवास करता येणार आहे. फास्ट टॅग नसलेली वाहन फास्ट टॅग मार्गातून गेल्यास संबंधित चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. याशिवाय टोल प्लाझावर अधिकृत केंद्रातून वाहनधारकाला तत्काळ फास्ट टॅग विकत घेऊन, कमीत कमी 500 रुपयांची अमानत रक्कम रिचार्जसाठी ठेवावी लागणार आहे.

वाहतूकदारांनी एमएसआरडीसीने निवडलेल्या अधिकृत बॅंकेच्या फास्ट टॅग विक्री केंद्रावरूनच फास्ट टॅग विकत घ्यावा. अनधिकृतपणे फास्ट टॅग विक्री होत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी, गर्दीच्या मार्गावर मागणी केल्यास अधिक फास्ट टॅग उपलब्ध करून देणार आहोत - कमलाकर फड, टोल विभागाचे मुख्य व्यवस्थापक.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com