त्याने खासदारामार्फत ऊर्जामंत्र्याशी संपर्क साधला... तरीही बिल भरून घेतले

थकित वीजबिलांमध्ये बड्या व्यवसायिकांचा जास्त समावेश आहे. त्यांची विजजोडणी तोडण्यास गेल्यावर थेट उर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री व खासदारांकडे धाव घेतली तरीही पुढील दोन दिवसांत बिल न भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
Electricity Bills Recovery Started in Chiplun
Electricity Bills Recovery Started in Chiplun

चिपळूण : थकित वीजबिलावरून महावितरणने ग्राहकांना थेट झटका देण्यास सुरवात केली आहे. १० महिन्याच्या कालावधीत ज्यांनी बिल भरलेले नाही, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यावर भर दिला आहे. थकित वीजबिलांमध्ये बड्या व्यवसायिकांचा जास्त समावेश आहे. त्यांची विजजोडणी तोडण्यास गेल्यावर थेट उर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री व खासदारांकडे धाव घेतली तरीही पुढील दोन दिवसांत बिल न भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी विजबिले भरली नाहीत. चिपळूण विभागात १२ हजार ७२९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून १० महिन्याच्या कालावधीत एकही बिल भरलेले नाही. यात बड्या व्यवसायिकांची थकित रक्कम देखील जास्त आहे. वालोपे येथील प्रसिद्ध मोठ्या हॉटेल व्यवसायिकाने सुमारे १२ लाखाचे विजबिल थकवले आहे. महावितरणकडून या उद्योजकाला अनेकदा बिल भरण्याची सूचना देण्यात आली. महावितरणचे कर्मचारी कारवाईस गेले, तेव्हा हॉटेल मालकाने एका खासदारांना फोन केला. खासदाराने थेट उर्जामंत्र्यांशी संपर्क साधला. उर्जामंत्र्यांनी पुन्हा महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या हाॅटेल मालकाने त्वरित २ लाख जमा केले. उर्वरित बिल दोन दिवसात भरण्याचे आश्वासन दिले. 

शहरातील मुबई गोवा महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाचे ६ लाख थकित आहेत. त्याने ५० हजार भरण्याची तयारी दर्शवली. उर्वरित रक्कम न जमा झाल्यास त्वरित विजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सावर्डेतील एका उद्योजकांने लाखोंचे बिल थकवले. कर्मचारी त्याच्याकडे बिलासाठी फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे दोन दिवसात या उद्योजकाचाही विजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणकडून घेतला आहे.

आंदोलनाचा इशारा देवूनही कारवाई सुरुच

गेल्या दोन दिवसांत शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिली. ग्राहकांवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नसल्याचा इशारा दिलाय. तरीही महावितरणची कारवाई थांबलेली नाही. याउलट हप्त्यात बिल भरण्याची सुविधा देऊनही जे ग्राहक बिले भरत नाहीत. त्यांचा विजपुरवठा खंडित केला जात आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com