एकनाथ खडसेंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह - Ekanath Khadse Corona Test Negative | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

एकनाथ खडसेंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

कैलास शिंदे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांना काल रात्री बॉम्बे हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. 

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांना काल रात्री बॉम्बे हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. 

रात्रीच डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी त्यांना  रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.आता ते मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल जळगाव येथे निगेटीव्ह आला होता. मात्र त्यांना सर्दी ताप याचा त्रास होत असल्याने त्यांनी काल (त.१९) मुंबई येथे उपचारास जाण्याच निर्णय घेतला होता. जळगांव येथून ते सायंकाळी रवाना झाले. 

कनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर नाथाभाऊ यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले होते, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा खानदेशचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला होता.  माजी मंत्री खडसे यांची अँटिजेन आणि आरटीफीसीआर या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले होते.

रात्री उशिरा ते ब्बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणीं त्यांचे अहवाल तपासणी करण्यात आली त्यांचा अहवाल निगेटिव्ह मार्किंग आल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.आता ते मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख