District President of Ratnagiri Nationalist Youth Congress changed in 24 hours | Sarkarnama

तटकरेंचा आव्हाडांना दे धक्का : राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष 24 तासांत बदलला 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 26 जून 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन दळवी यांची नियुक्ती करताना तटकरे यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी पक्षातंर्गत दबाव सुरू झाला आणि दळवी यांना 24 तासांतच राजीनामा द्यावा लागला.

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन दळवी यांची नियुक्ती करताना तटकरे यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी पक्षातंर्गत दबाव सुरू झाला आणि दळवी यांना 24 तासांतच राजीनामा द्यावा लागला.

यावरून सुनील तटकरे यांचे जिल्ह्यात वजन असल्याचे दिसून आले. हा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. 

चेतन दळवी यांनी त्यांच्या निवडीनंतर अवघ्या चोवीस तासांत पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत विरोधामुळे दळवी यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. दळवी यांचे मूळ गाव राजापूर येथील आहे. परंतु ते सध्या ठाणे येथे पक्षामध्ये सक्रिय आहेत. 

दळवी यांना रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सक्रिय व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे जिल्हाध्यक्ष पदाची मागणी केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे दळवी हे मोठे समर्थक आहेत. त्यामुळे दळवी यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यात आव्हाड यांनी मोठी भूमिका निभावली होती. 

पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राकेश चाळके यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करून जिल्हाध्यक्षपदाची जागा रिकामी करण्यात आली होती. तेथे चेतन दळवी यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

सावर्डे येथे झालेल्या पक्षाच्या अभिप्राय सभेत दळवी यांना नियुक्तीचे पत्रही देण्यात आले होते. मात्र, दळवी यांच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत कुरबूर सुरू झाली होती. जिल्ह्यात पक्षाचे अनेक युवक या पदासाठी लायक असताना त्यांना डावलून बाहेरचा कार्यकर्ता का दिला? अशी विचारणा सुरू झाली होती. 

 

निसर्गग्रस्तांना केंद्र सरकारने एक रुपयाही दिला नाही 

अलिबाग : प्रचलित नुकसान भरपाईच्या निकषांना बगल देत राज्य सरकारने तीनपट जादा मदत निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना दिली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत देण्यात आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. 

अलिबाग तालुक्‍यातील बेलोशी येथे शुक्रवारी (ता. 26 जून) मदत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 

खासदार तटकरे म्हणाले की रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 77 कोटी 50 लाख 82 हजार रुपयांच्या तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर दीर्घ मदतीसाठीही राज्य सरकारने निर्णय घेतले असून याचा फायदा निसर्ग चक्री वादळाचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा संसार सावरण्यासाठी होणार आहे. 

 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. आम्हाला स्थानिक कोणीही चालेल. जिल्ह्याबाहेरचा पदाधिकारी दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी आपल्या व्यथा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्या होत्या. 
- गौरव पाटेकर, उपाध्यक्ष, 
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, रत्नागिरी जिल्हा 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख