Disagreement among ministers of Mahavikas Aghadi government exposed on the Police transfers | Sarkarnama

पोलिसांच्या बदल्यावरून सरकारमधील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 5 जुलै 2020

मुंबई पोलिस दलातील दहा पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने रविवारी (ता. 5 जुलै) अचानक रद्द केल्या आहेत. याबाबतचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पण, या बदल्या मुख्यमंत्री कार्यालयाने गृहमंत्र्यांना विश्‍वासात न घेता केल्या होत्या का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबई : मुंबई पोलिस दलातील दहा पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने रविवारी (ता. 5 जुलै) अचानक रद्द केल्या आहेत. याबाबतचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पण, या बदल्या मुख्यमंत्री कार्यालयाने गृहमंत्र्यांना विश्‍वासात न घेता केल्या होत्या का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमधील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 

देशात कोरोनाचे संकट गडद असतानाच, या वर्षी पोलिस दलाच्या कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे सरकारने कळविले होते. त्यातच मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी अनावश्‍यकरित्या बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करीत कारवाई करण्यास सुरुवात केली.

त्यातच या दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर दोन उपायुक्त प्रतिनियुक्तीवर दिल्लीत गेले आहेत. बदली आदेशातनंतर काही अधिकाऱ्यांनी ननीन ठिकाणी पदभारदेखील स्वीकारला, तर काही अधिकारी नाराज असल्याने त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. या बदलीबाबत गृह विभागाला विश्वसात घेतले गेले नसल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

त्यानंतर आज (रविवारी) या बदल्या अचानक रद्द करीत सर्व पोलिस उपायुक्तांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त अभिलाश कुमार हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्याने, त्यांचा अतिरिक्त कार्यभार हा मुख्यालय एकच्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दुसरीकडे परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नियती ठाकरे या देखील प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्याने, त्यांचा अतिरिक्त कार्यभार पोलिस उपायुक्त प्रणव अशोक यांच्याकडे राहणार आहे. 

दरम्यान, यामध्ये दक्षिण मुंबईतील परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची पोलिस मुख्यालयात उपायुक्त अभियान या पदावर बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या जागी परिमंडळ 7 चे पोलिस उपयुक्त परमजितसिंग दहिया यांची बदली करण्यत आली होती. सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलिस उपयुक्त प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ 7 ची जबाबदारी देण्यात आली होती.

विशेष शाखा-1 चे गणेश शिंदे हे बंदर परिमंडळचे कामकाज पाहणार होते. तसेच पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर यांच्याकडे सायबर आणि सायबरचे उपायुक्त विशाल ठाकूर यांची परिमंडळ 11 येथे बदली करण्यात आली होती. त्याचप्रमाणे शहाजी उमाप (विशेष शाखा 1), डॉ मोहन दहीकर (गुन्हे शाखा), नंदकुमार ठाकूर (मुख्यालय-1) यांचा समावेश होता. 

 मुंबई पोलिस आयुक्तांनी केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री कार्यालय आणि गृह विभागकडून स्थगिती देण्यात आली आहे. यात सरकारमध्ये कुठेही वाद नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या या महाविकास आघाडी सरकारमध्ये समनव्य कायम आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. 
-अनिल देशमुख, गृहमंत्री 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख