The death of a young man with a coronary heart disease, also affects his brother | Sarkarnama

कोरोनाबाधित तरुणाच्या मृत्यू, भावालाही बाधा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

कुटुंबात आनंदाचे दिवस घेऊन येणाऱ्या बाळाचे जग पाहण्याआधीच पितृछत्र हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई : मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीतील तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याची पत्नी तीन महिन्यांची गरोदर आहे.

राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्यामुळे मानखुर्द परिसरावर शोककळा पसरली आहे.

वाशी स्थानक परिसरातील खासगी कंपनीत नोकरी करत असलेला  लॉकडाऊनमुळे घरूनच काम करत होता. अत्यावश्‍यक कारणांसाठीच फक्त बाहेर पडत होता. मागील आठवड्यात त्याला मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला.

त्यानंतर त्याने परिसरातील डॉक्‍टरकडून उपचार घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रक्त तपासणीचा अहवाल पाहून डॉक्‍टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. 

नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केल्यानंतर केलेल्या तपासणीत त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्याची प्रकृती ढासळू लागल्यानंतर मुंब्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.

शनिवारी उपचारादरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी तीन महिन्यांची गरोदर आहे. कुटुंबात आनंदाचे दिवस घेऊन येणाऱ्या बाळाचे जग पाहण्याआधीच पितृछत्र हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्याच्या भावालाही बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
पवईत आतापर्यंत 179 जण कोरोनाग्रस्त असल्याचे अहवाल सांगत असला तरीही बाधितांमध्ये बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाधितांची संख्या अधिक असताना बरे होण्याचे प्रमाण 38 टक्‍क्‍यांवर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात येत आहे.

आतापर्यंत 67 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असे असले तरीही लॉकडाऊनचे नियम पाळणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईतील वस्त्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. पवईत मार्च महिन्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर संख्या वाढत गेली.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख