सावधान! 'निसर्ग'ची तीव्रता वाढतेय; मुबंईसह कोकणात दक्षतेचा इशारा

आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावाने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या वादळाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून, ते बुधवारी मुंबईत धडकणार आहे.
cyclone nisarga likely to turn into cylonic storm says meteorological department
cyclone nisarga likely to turn into cylonic storm says meteorological department

नवी दिल्ली : निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, ते गुजरात आणि महाराष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. हे वादळ पुढील 24 तासांत मुंबईत धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. 

पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे 11 किलोमिटर प्रतितास वेगाने सरकत आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची चिन्हे आहेत. पुढील 12 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल आणि त्यानंतरच्या 24 तासांत त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे बुधवारी (ता. ३) कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि दक्षिण गुजरातला चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. किनारपट्टीवर पोचेपर्यंत वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १०५ किलोमीटर राहील, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

‘अम्फान’ चक्रीवादळाने अलीकडेच पूर्व किनाऱ्यावर थैमान घातले होते. यात पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांना मोठा फटका बसला होता. आता पश्चिम किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ घोंघावत असून, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर ते धडकणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना फटका अधिक बसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत आणखी तीव्र होऊ शकतो. यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये याचा फटका बसेल. या भागामध्ये वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. बुधवारपर्यंत (ता.३) पावसाचे प्रमाण २० सेमीपेक्षा अधिक राहू शकते. 

केंद्र सरकार, तसेच लक्षद्वीपसह केरळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्य सरकारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी चार जूनपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, असेही नमूद करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com