Offencer Registred Against Sambit Patra
Offencer Registred Against Sambit Patra

माजी पंतप्रधानांवर टिका करणाऱ्या सांबीत पात्रा यांच्याविरुद्ध गुन्हा 

पात्रा यांच्या ट्विट हँडलवरून पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी या दोन माजी पंतप्रधानांचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता.

पुणे : माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी करणारे भाजप प्रवक्ते सांबीत पात्रा यांच्याविरुद्ध कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे सचिव ब्रिजकिशोर दत्त यांनी याबाबत तक्रार दिली होती.

पात्रा यांच्या ट्विट हँडलवरून पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी या दोन माजी पंतप्रधानांचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. ही बाब लक्षात येताच युवक काँग्रेसचे सचिव ब्रिजकिशोर दत्त यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पात्रा यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दत्त म्हणाले, "पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र लढ्यात मोठे योगदान आहे, त्यांच्या दूरदृष्टीतून आरोग्य, शिक्षण, सहकार, सार्वजनिक उद्योग, दळणवळण, शेती, सिंचन , संशोधन यांसह विविध क्षेत्रात उभ्या केलेल्या संस्था आज देशाला मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडवून आणली, संशोधनावर भर देत विकासाला अधिक गतिमान करण्याचे काम त्यांनी केले, देशासाठी लढत आपल्या प्राणाची आहुती दिली.

अशा या निःस्वार्थ भावनेने काम केलेल्या दिवंगत पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचे काम भाजप प्रवक्ते सांबीत पात्रा यांनी केल्यामुळे देशभर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासह करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आमच्या नेत्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी करणाऱ्या पात्रा यांच्यावर कारवाई व्हावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.


देशात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे," असे त्यांनी म्हटले आहे. "जोपर्यंत अशा प्रवृत्तींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत कायदेशीर मार्गाने लढाई सुरूच राहील.

 ब्रीजकिशोर दत्त, सचिव युवक काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com