खडसेंना धक्का;  जावयाचा जामीन फेटाळला - court rejects bail application of son in law of Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

खडसेंना धक्का;  जावयाचा जामीन फेटाळला

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 4 सप्टेंबर 2021

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव : पुणे, भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ईडीने अटक केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhri) यांचा जामीन अर्ज काल शुक्रवारी मुंबईच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  (court rejects bail application of son in law of Khadse)

हेही वाचा : राजू शेट्टी यांचा पत्ता कट..राज्यपालाकडे हेमंत टकले यांचं नाव ? 

भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ईडी तर्फे चौकशी सुरू आहे. याप्रकरणी त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ५ जुलै रोजी ईडीने अटक केली. गिरीश चौधरी यांनी जमीन मिळण्यासाठी दाखल केलेला जमीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

या अगोदरही चौधरी यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. याच प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ही ईडीने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजाव्यात आली आहे, मात्र त्यांनी आजारपण असल्याने वेळ मागून घेतली होती. त्याची मुदतही आता संपली आहे. याआधी खडसे यांचे जावई गिरीश चैाधरी यांना ईडीने (ED) अटक केली होती. त्यांना विशेष न्यायालयाने 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे जावई व पत्नीचेही या प्रकरणात नाव आहे. यापूर्वीही ईडीने खडसे यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीकडून चौधरी त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर  कोठडी देण्यात आली होती. खडसे यांनी मात्र, जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मुळ जमीनमालकच या जमिनीचा मालक आहे. त्याने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतलेला नाही. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया रद्द झाल्याने कुणीही जमीन विकत घेऊ शकतो. हे कायदेशीरच आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख