दिलासादायक : राज्यात आतापर्यंत 28 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले 

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग आठवडाभरात 6.2 टक्‍क्‍याने कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात हा वेग 11.3 दिवस होता, तो आता 17.5 दिवस झाला आहे.शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 2940 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 34 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Corona's 28,000 patients have so far recovered and returned home
Corona's 28,000 patients have so far recovered and returned home

मुंबई : संपूर्ण राज्यभरात बरे झालेल्या 1084 कोरोना रुग्णांना शनिवारी (ता. 30) घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 28 हजार 81 वर पोचली आहे. तसेच, राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग आठवडाभरात 6.2 टक्‍क्‍याने कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात हा वेग 11.3 दिवस होता, तो आता 17.5 दिवस झाला आहे. 

दरम्यान, शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 2940 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 34 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 17.1 दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 43.07 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे, असे टोपे यांनी सांगितले. सध्या राज्यात 43 शासकीय आणि 34 खाजगी अशा 77 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण लाखामागे 3,349 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2,523 आहे. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाइन आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये 72 हजार 681 खाटा उपलब्ध आहे. सध्या 35 हजार 420 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 

शनिवारी दिवसभरात 99 जणांचा मृत्यू 

राज्यात शनिवारी 99 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईत 54, ठाण्यात 6, वसई-विरारमध्ये 7, नवी मुंबईत 2, रायगडमध्ये 3, पनवेलमध्ये 7, कल्याण डोंबिवली येथे 2, नाशिक, जळगावमध्ये प्रत्येकी 3, पुण्यात 12, नागपूरमध्ये 1; तर परराज्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू पनवेल व मुंबईत मृत्यू झाला आहेत. यामध्ये 62 पुरुष, तर 37 महिलांचा समावेश आहे. 

अतिजोखमीचे 66 जणांना आजार 

राज्यात शनिवारी झालेल्या 99 मृत्यूंपैकी 66 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, असे अतिजोखमीचे विविध आजार होते. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2197 झाली आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3169 झोन क्रियाशील आहेत. शनिवारी एकूण 17 हजार 917 सर्वेक्षण पथकांकडून 68.51 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com