मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीशेजारच्या बंगल्यातील ज्येष्ठ नागरिक कोरोना झाला आहे. हे गृहस्थ सध्या अंधेरी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनावरील औषधावरुन योगगुरू रामदेवबाबा अडचणीत #Sarkarnama #ramdevbaba #Patanjali #CoronaUpdatesInIndia https://t.co/7i10CWrZZS
— MySarkarnama (@MySarkarnama) June 24, 2020
मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबई, पुण्यासह राज्यातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या बांद्रातील कलानगरमध्ये ठाकरे यांचा मातोश्री बंगला आहे. हा बंगला राज्याचे एक सत्ता केंद्रही आहे. या बंगल्या शेजारीच एक बंगला आहे. या बंगल्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याने कलानगरा आरोग्य विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्राला आनंदाची बातमी
मुंबईतील परिस्थिती जुलैच्या अखेरपर्यंत सुधारेल. नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहान संसर्गजन्य आजार विशेषज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला कोरोनाविरोधी लढाईबाबत आनंदाची बातमी आहे. कोरोनामुक्त होऊन रुग्ण घरी परत जाण्याचा दर टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत नवीन रुग्णांच्या वाढीचा दर घसरून टक्के झाला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जूनपर्यंत राज्यातील हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. ही संख्या जूनपर्यंत टक्क्यांनी वाढून हजार वर गेली. त्याचप्रमाणे जूनपर्यंत कोरोनाच्या एक लाख हजार रुग्णांची नोंद झाली होती. या संख्येत जूनपर्यंत टक्के वाढ होऊन एक लाख हजार रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई आणि राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी सुरक्षित अंतर पाळणे महत्त्वाचे आहे. तसेच मुंबईतील परिस्थिती सुधारेल सक्रिय रुग्णांतील वाढ कमी असल्यास रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होणे सोपे होईल असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

