सावधान : महाराष्ट्रात दोन महिन्यांत लाखभर लहान मुलांना कोरोनाचा विळखा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.
Corona infection in 99000 children in Maharashtra in two months
Corona infection in 99000 children in Maharashtra in two months

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा दावा केला जात आहे. पण महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच अनेक लहान मुलांना कोरोनाचा विळखा पडला आहे. मागील दोन महिन्यांतच महाराष्ट्रातील सुमारे ९९ हजार मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ही सर्व मुलं एक ते दहा वर्षे या वयोगटातील आहेत. (Corona infection in 99000 children in Maharashtra in two months)

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. पहिल्या लाटेतही महाराष्ट्रातील रुग्ण संख्या जास्त होती. पण दुसऱ्या लाटेत हा आकडा कित्येक पटीने वेगाने वाढला. या लाटेत अनेक कुटूंब कोरोनाचे बळी ठरली. त्यामध्ये लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधी महाराष्ट्रात ३० हजार लहान मुलांना संसर्ग झाला होता. पुढील दोन महिन्यांत त्यामध्ये वेगाने वाढ झाल्याचे दिसते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच हा आकडा ९९ हजार ६ वर पोहचला आहे. 

यावर्षी आतापर्यंत १ लाख २८ हजार ८२७ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच १ ते १८ वयोगटातील कोरोना बाधित मुलांची संख्या सुमारे दहा हजार एवढी आहे. मुंबईत मे महिन्यात नऊ वर्षापर्यंतच्या नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ५१ हजार ६४८ तर मे महिन्यांत ४७ हजार ३५८ मुलांना संसर्ग झाला आहे. 

मे महिन्यातील बाधित मुलांपैकी सुमारे १० हजार ५०० मुलं चार वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. मागीलवर्षी पहिल्या लाटेत एकूण ६७ हजार ११० मुलांना संसर्ग झाला होता. यावर्षी केवळ पाच महिन्यांत सुमारे १ लाख ३० हजार मुलांना कोरोनाचा विळखा पडला आहे. मागील वर्षीपेक्षा हा आकडा जवळपास दुप्पट आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून मात्र तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता फेटाळली आहे. कोरोना विषाणूमध्ये बदल झाल्यासच मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॅाल यांनी सांगितलं. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com