राज्यात पंधरा दिवसांचा लॅाकडाऊन, मुख्यमंत्र्यांची घोषणा - CM Uddhav Thakarey Declares 15 days lockdown in state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

राज्यात पंधरा दिवसांचा लॅाकडाऊन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 मे 2021

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 15 दिवसांचा लॅाकडाऊन गरजेचा असल्याचे स्पष्ट मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते.

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंधरा दिवसांच्या लॅाकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार सोमवार (ता.12) पासून राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प राहणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून येत्या सोमवारपासून राज्यात 15 दिवसांचा कडक लाॅकडाऊन लागण्याचे सूतोवाच त्यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्यानंतर आज टास्क फोर्स बैठकीत त्यांनी लॅाकडाऊनवर शिक्कामोर्तब केले. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 15 दिवसांचा लॅाकडाऊन गरजेचा असल्याचे स्पष्ट मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही मांडले होते. टास्क फोर्सनेही त्याला संमती दिल्याने ठाकरे सरकारने राज्यात लॅाकडाऊनचा निर्णय घेतला.

काल राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला होता. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेतला. ठाकरे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत लाॅकडाऊन कसा गरजेचा आहे, हे विषद केले.

मुख्यमंत्र्यांच्या मतानुसार,  कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. राज्यातील क्षणाक्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल, असा इशारा कालच मुख्यमंत्र्यांनी दिला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख