उद्धव ठाकरेंचा राज यांना फोन; मनसेनेही केले ट्वीट 

राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. त्यामुळे लाॅकडाऊन सारखा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारला सहकार्य करावे, ही विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन केला.
Uddhav Thackeray Raj Thackeray new
Uddhav Thackeray Raj Thackeray new

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढले आहे. त्यामुळे लाॅकडाऊन (Lock Down) सारखा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सरकारला सहकार्य करावे, ही विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दुपारी मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला. 

मनसेने ट्वीटरवरुन ही माहिती दिली. त्यानंतर मनसेने मुख्यमंत्र्यांचे आवाहन स्वीकारत लोकांनी सरकारी सूचनांचे पालक करून सहकार्य करावे असे ट्विट केले आहे. दरम्यान, आम्ही कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहोत, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanaivs) केले. त्यावर सरकारने जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यावा, भाजप सरकारच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाला हरविण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोरोनासाठी काही उपाययोजना केल्या तर त्याचे राजकारण करू नका, असा टोला विरोधकांना लावला होता. लाॅकडाऊनची प्रत्यक्ष घोषणा त्यांनी केलीली नाही. पण तो लावण्याचा इशारा राज्याच्या जनतेला शुक्रवारी दिलेल्या संदेशात त्यांनी दिला होता. भाजपच्या नेत्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळे ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. Uddhav Thackeray Telephoned MNS Chief Raj Thackeray

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट व टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे असे आवाहन केले. निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन दिले. Uddhav Thackeray Telephoned MNS Chief Raj Thackeray

या बैठकीत महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजे भोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, डॉ अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदींची उपस्थिती होती
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com