नितेश राणे म्हणतात, ``चिपी विमानतळाचे पूर्ण श्रेय हे साहेबांचेच!`` - Chipi airport credit only goes to Narayan Rane says Nitesh Rane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

नितेश राणे म्हणतात, ``चिपी विमानतळाचे पूर्ण श्रेय हे साहेबांचेच!``

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

विमानतळाला विरोध करणारे शिवसेनेचे लोक, आज श्रेय लाटायला पुढे-पुढे करत असल्याचा नितेश यांचा आरोप

सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्गमधील चिप्पी परूळे विमानतळाच्या उद्घाटनावरुन राजकीय वातावरण चांगलेच  तापले असून पुन्हा एकादा नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (ShivSena) आमने-सामने आले आहेत. या विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत पुन्हा जुंपली आहे. हे विमानतळ पुर्ण होण्यासाठी नारायण राणे (Nitesh Rane) यांनीच सातत्याने पाठपुरावा केला असून याचे पूर्ण श्रेय हे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच जाते. याबाबतची फेसबुक पोष्ट नारायण राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश यांनी केली आहे. 

नितेश राणे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ``सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे नारायण राणे यांचेच स्वप्न होते. त्यांच्या अथक प्रयत्नांनी २००९ साली विमानतळ मंजूर झाले. तसेच, ते २०१४ पर्यंत पालकमंत्री असतांना विमानतळाचे ७० टक्के काम पूर्ण झाले होते. विमानतळ हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने केंद्राच्या सर्व परवानगी राणे यांनीच मिळवून दिल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला. तर, लोकांची दिशाभूल करून अडथळे निर्माण केले होते. मात्र, आज विमानतळ पूर्ण होताच, विमानतळाला विरोध करणारे शिवसेनेचे लोक, आज श्रेय लाटायला पुढे-पुढे करत आहेत. तर, २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याशी काडीचा संबंध नसलेले खासदार विनायक राऊत फुकटच्या श्रेयासाठी बडबड करत आहे

दरम्यान, मंगळवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलविण्याची गरज नसल्याचे राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रत्यूत्तर देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन उद्घाटनाची वेळ ठरवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच नारायण राणे यांना धक्का दिल्यीची चर्चा राजकीय वर्तुळात सुर झाली आहे.

हेही वाचा : प्लीज, मॅडम मला इथून घेऊन चला; भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती

ज्योतिरादित्य शिंदे हेच विमानतळाचे उद्घाटन करतील, असे सांगतानात शिवसेनेने कोकणामध्ये कोणताच प्रकल्प आणला नाही. त्यांनी आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचे कोणतेच खासदार कामाचे नाही. फक्त 'कलेक्शन मास्टर' आहेत. हा विमानतळ आम्ही तिथे आणला. त्याचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री हेच करतील. त्यांना (सेनेला) कुणी उद्घाटनाची परवानगी दिली आहे. विमानतळ हा केंद्राचा विषय आहे, असे राणे म्हणाले होते.

हेही वाचा : फडणवीस म्हणाले, गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख