पंढरीच्या वारीसाठी मुख्यमंत्री स्वत:च बनले चालक

पंढरपूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
chief minister uddhav thackeray drives to pandharpur with family
chief minister uddhav thackeray drives to pandharpur with family

मुंबई : कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला संकटमुक्त कर, ही प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च गाडी चालवत गेले आहेत. पर्यावरण मंत्री आणि चिरंजीव आदित्य ठाकरे तसेच, पत्नी रश्मी ठाकरे असे तिघेच या गाडीत आहेत. लोणावळा, भिगवण अशा दोन ठिकाणी विश्राम करुन ही मंडळी पंढरपूरकडे गेली. 

मुख्यमंत्र्यांची एका एका अर्थाने ही मोटारवारी आहे. राज्यातील विशेषत:सोलापुरातील परिस्थितीवर पालकमंत्री दत्ता भरणे तसेच, विभागीय आयुक्त म्हैसेकर ,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील अशा सातआठ जणांशी मुख्यमंत्री रात्री उशिरा चर्चा करणार आहेत. उद्या पहाटे मंदिरातील सेवेकऱ्यांच्या हातून विठ्ठलाची पूजा होणार आहे. त्यानंतर सकाळी  मुख्यमंत्री पुणे विश्रामगृहात थोडा आराम करून मुंबईला परतणार आहेत. 

कोरोना महामारीच्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत थांबूनच संपुर्ण परिस्थिती हाताळत आहेत. चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते काही तास अलिबागजवळ आले होते. आज आषाढी वारीच्या महापूजेसाठी ते दुसऱ्यांदा मुंबईबाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांतच राज्यात कोरोनाचे संकट आले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यात दोन रूग्ण आढळले. त्याचा परिणाम म्हणून विधिमंडळाचे अधिवेशन लगेचच गुंडाळण्यात आले. आरोग्य यंत्रणेची सज्जता करण्याबरोबरच प्रस्तावित लॉकड़ाऊनवर सरकारला काम करावे लागले.  

मुख्यमंत्र्यांनी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत होते. त्यांनी लोकप्रतिनिधी, तसेत विविध राजकीय, सामाजिक नेत्यांशी संवाद ठेवला होता. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या टप्प्यात प्रार्दुभावाचा अंदाज येत नव्हता. त्यातच लोकांना मूळ गावी जाण्याची घाई होती. मुख्यत: परप्रांतिय लोकांना परत पाठवण्याचे आव्हान होते. केंद्र सरकारचे धोरण, तसेच संबंधित राज्यांचा समन्वय याकामी महत्वाचा होता. यातूनही सरकारने मार्ग काढत लाखो लोक परराज्यात पाठवले. त्यानंतर राज्यातील अडकलेले लोक आपापल्या जिल्ह्यात पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. 

हे काम सुरू असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ आले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. ते पाहण्यासाठी काहीवेळ उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यात आले होते. लगेचच परत जावून त्यांनी मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री दुसऱ्यांचा मुंबई बाहेर पडत आहेत. त्यांच्याहस्ते उद्या पहाटे पंढरपूरमध्ये विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com