चंद्रकांतदादांनी उध्दव ठाकरेंवर अविश्वास दाखवत योगी आदित्यनाथांना लिहिले पत्र...

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या शरजील उस्मानीविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.
Chandrakant Patil wrote a letter directly to Yogi Adityanath for Action on sharjil usmani
Chandrakant Patil wrote a letter directly to Yogi Adityanath for Action on sharjil usmani

मुंबई : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या शरजील उस्मानीविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे त्याच्यावर कारवाई करणार नाहीत, असे सांगत थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पत्र लिहिले आहे. शरजीलला तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शरजील हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. पुण्यात 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत त्याने हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी त्याच्यावर पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील भाजपचे नेते आक्रमक झाले असून शरजीलला तातडीने अटक करण्यात मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकेर त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, महाराष्ट्रात हिंदूना राहणे आता मुश्किल झाले आहे. राज्यात हिंदूना कोणी वाली नाही. मुळात एल्गार परिषदेला परवानगीच कशी दिली जाते, हा प्रश्न आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलायचे का? कायद्याच्या चौकटीत त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याने योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाई मागणी केली आहे. 

काय म्हटले आहे पत्रात?

शरजील उस्मानी याने हिंदू समाजाविषयी अत्यंत अपमानजनक वक्तव्य केली आहेत. 'आजचा हिंदू समाज सडला आहे' अशाचप्रकारची अनेक वक्तव्य त्याने केली असून ती समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील संविधानिक संस्थांविरूध्द अशाप्रकारची भाषा राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही.

या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रासह संपुर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याने वक्तव्य करून पाच दिवस झाले असले तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकेर यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. हे सरकार कारवाई करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com