महाविकास आघाडीच्या 'या' मंत्र्यांनी केला कांदा निर्यात बंदीला विरोध

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाची विक्री झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र आधीच अडचणीत आले आहे. इतर वस्तूंचे भाव वाढल्यास त्यांची निर्यात थांबवली जात नाही मग कांद्याच्या बाबतीत असे का होते, असा सवाल छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे. दादा भुसे यांनीही कांदा निर्यात बंदीला विरोध केला आहे
Chagan Bhujbal Dada Bhuse Oppose Onion Export Ban
Chagan Bhujbal Dada Bhuse Oppose Onion Export Ban

मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. यातून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. कांदा उत्पादक हा गरीब शेतकरी आहे. त्याच्या हितासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाची विक्री झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र आधीच अडचणीत आले आहे. इतर वस्तूंचे भाव वाढल्यास त्यांची निर्यात थांबवली जात नाही मग कांद्याच्या बाबतीत असे का होते, असा सवाल छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे. 

शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळायला हवा, असे पंतप्रधान सांगतात. त्यामुळे कांदा उत्पादकाला दुप्पट हमीभाव द्यावा व भाव कोसळल्यास त्यांना पैसे द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. निर्यातबंदीच्या निर्णयाबाबत समजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून ते यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

दुसरीकडे, कृषीमंत्री दादा भुसे यांनीही कांदा निर्यात बंदीला विरोध केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचं सांगत हा निर्णय केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा असे मत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलय . त्यामुळे आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे . कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आता कुठे सुगीचे दिवस येत असताना केंद्राने ही निर्यातीवर घातलेली बंदी चुकीची असल्याचं भुसे म्हणाले . ते आज पालघर दौऱ्यावर आले असता बोलत होते. मात्र कांदा हा इतकाही जीवनावश्यक नसून ज्याला जस पटेल तसं तो घेईल अस ही भुसे या वेळी म्हणाले
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com