मध्य रेल्वेने चालवल्या ६०० श्रमिक विशेष गाड्या; साडेआठ लाखांहून अधिक कामगार परतले

राज्य सरकारच्या विनंतीनुसार मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील स्थानकांतून श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. रेल्वेगाडीची (रेक) जोडणी, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, कर्मचाऱ्यांची तजवीज, अन्नाची तरतूद, राज्य सरकारांशी समन्वय, सुरक्षितता, वेळेवर संचालन असे 'मिशन बॅक होम' यशस्वीपणे राबवल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Central Railway Ran Six Hundred Shramik Special Trains
Central Railway Ran Six Hundred Shramik Special Trains

मुंबई  : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वेने वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थ्यांसाठी एक मेपासून श्रमिक विशेष गाड्या सोडल्या होत्या. मध्य रेल्वेने आतापर्यंत सुमारे ६०० श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्या आहेत.

राज्य सरकारच्या विनंतीनुसार मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील स्थानकांतून श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. रेल्वेगाडीची (रेक) जोडणी, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, कर्मचाऱ्यांची तजवीज, अन्नाची तरतूद, राज्य सरकारांशी समन्वय, सुरक्षितता, वेळेवर संचालन असे 'मिशन बॅक होम' यशस्वीपणे राबवल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. विशेष म्हणजे, अशा लॉकडाऊनचा अनुभव नसतानाही रेल्वेने ही मोहीम यशस्वी केली. मध्य रेल्वेने सुमारे ६००  श्रमिक विशेष गाड्या चालवून साडेआठ लाखांहून अधिक कामगारांना मूळ राज्यांत पोहोचवले आहे.

मुंबई विभाग अव्वल

चालवण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये मुंबई विभागाचा वाटा ६६ टक्के, पुणे विभागाचा वाटा २३ टक्के आणि सोलापूर, भुसावळ व नागपूर विभागांचा वाटा सुमारे ११ टक्के होता. मुंबई विभागामार्फत जास्तीत जास्त गाड्या चालवल्या जात असताना, इतर चार विभागांनी मागणीत वाढ झालेल्या दिवसांत आठ-नऊ रेक राखून ठेवले होते.

या राज्यांसाठी धावल्या श्रमिक ट्रेन

आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल.

प्रथमच पोहोचली मध्य रेल्वे

कामगारांना मूळ गावी पोहोचवण्यासाठी 'मिशन बॅक होम' राबवण्यात आले. मध्य रेल्वेने जम्मू-काश्‍मीर, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांत पहिल्यांदाच थेट सेवा दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com