रेल्वेने प्रवास करायचाय, मग थोडे थांबा! राज्यांतर्गत 18 गाड्या रद्द  - Central Railway has cancelled 20 trains due to poor occupancy | Politics Marathi News - Sarkarnama

रेल्वेने प्रवास करायचाय, मग थोडे थांबा! राज्यांतर्गत 18 गाड्या रद्द 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे या गाड्या रद्द करत असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे, बस, खासगी वाहनाने प्रवासावरही अनेक बंधने आली आहेत. परिणामी, राज्यांतर्गत धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने आज 18 रेल्वेगाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे या गाड्या रद्द करत असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या गाड्यांमध्ये बहुतेक गाड्या पुणे व मुंबईतून धावणाऱ्या आहेत. तसेच नागपूर, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या गाड्यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक पाहूनच प्रवास केल्यास पुढील त्रास टळू शकतो. 

मध्य रेल्वेने  रद्द केलेल्या गाड्या :

1)  02109/02110 मुंबई -मनमाड- मुंबई विशेष - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

2)  02015/02016 मुंबई - पुणे- मुंबई विशेष- ता. 27 एप्रिल ते 10 मे  

3)  02113 पुणे- नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष - ता. 28 एप्रिल ते 10 मे 
4) 02114 नागपूर - पुणे त्रि-साप्ताहिक विशेष - ता. 27 एप्रिल ते 9 मे 

5)  02189 मुंबई- नागपूर विशेष - ता. 28 एप्रिल ते 11 मे 

6) 02190 नागपूर- मुंबई विशेष - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

7)  02207 मुंबई - लातूर विशेष आठवड्यातील चार दिवस - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

8) 02208 लातूर - मुंबई आठवड्यातील चार दिवस विशेष - ता. 28 एप्रिल ते 11 मे 

9)  02115  मुंबई - सोलापूर विशेष - ता. 28 एप्रिल ते 11 मे 

10) 02116 सोलापूर - मुंबई विशेष - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

11)  01411 मुंबई- कोल्हापूर विशेष - ता. 28 एप्रिल ते 11 मे 

12) 01412 कोल्हापूर-मुंबई विशेष - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

13) 02111 मुंबई-अमरावती विशेष - ता. 28 एप्रिल ते 11 मे 

14) 02112 अमरावती-मुंबई विशेष - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

15)  02271 मुंबई-जालना विशेष - ता. 27 एप्रिल ते 10 मे 

16) 02272 जालना-मुंबई विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत 

17)  02043 मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक  विशेष - ता. 28 एप्रिल ते 8 मे 

18) 02044 बिदर-मुंबई त्रि-साप्ताहिक  विशेष - ता. 29 एप्रिल ते 9 मे 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख