100 कोटींची वसुली : अनिल देशमुखांना सीबीआयची क्लिनचीट?

माजी मंत्री अनिल देशमुख याच्यावर बदल्यांसंदर्भात गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
Anil Deshmukh.jpg
Anil Deshmukh.jpg

अहमदनगर ः राज्याच्या राजकारणात मोठा धमाका उडवून देणाऱ्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचीट सीबीआयने दिली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे. एवढेच नाही तर बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात एक दोनदाच संभाषण झाल्याचे म्हटले आहे. 

माजी मंत्री अनिल देशमुख याच्यावर बदल्यांसंदर्भात गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्या संदर्भात सीबीआयकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीत देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे अहवालात म्हटले आहे. सीबीआयचा हाच अहवाल हाती लागला असून या अहवालात अनिल देशमुखांविरोधात सीबीआयच्या चौकशीत ठोस  पुरावे मिळून आले नसल्याचे म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की,

मुंबईतल्या पोलिस उपायुक्त पदापर्यंतच्या बदल्या या पोलिस आयुक्तालयातून ठरवल्या जातात. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या या पोलिस आस्थापना मंडळाकडून गृहसचिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवल्या जातात. पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत निलंबित अधिकारी यांना पुन्हा पोलिस खात्यात घेण्याचे अधिकार हे पोलिस आस्थापन मंडळाला असतात. तर ग्रामीण भागातील निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतचे अधिकार हे महाराष्ट्र पोलिस महासंचालक व गृहसचिव यांना असतात. मुंबई शहरामध्ये पोलिस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे पूनस्थापनेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे पोलिस आयुक्तांना आहेत.

हेही वाचा...

सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा निर्णय हा पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सचिन वाझेच्या पूनस्थापनेनंतर दोनच दिवसात त्याला सीआययू चा इनचार्ज म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. ही पोस्ट वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची असताना. सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर पून्हा नियुक्ती झालेल्या सचिन वाजेला देण्यात आली.  ही पोस्ट पोलिस खात्यातील महत्वाची पोस्ट असताना,  एका सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरील अधिकारी सचिन वाझे याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यावर तत्कालिन सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

सचिन वाजेची नियुक्ती केल्यानंतर तो प्रोटोकाँल पाळत नव्हता. तसेच  तो त्यांच्या वरिष्ठांना डावलून थेट पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करत होता. अँन्टिलिया स्फोटक प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आले होतेकी, मुंबईतील अनेक मोठे आणि संवेदनशील गुन्हे हे पोलिस आयुक्त परमबीर सिंह  याच्या आदेशानुसार सचिन वाजेला तपासासाठी देत होते. तसेच या संवेदनशील गुन्ह्यांची माहिती तत्कालिन पोलिस आयुक्त परमबिर सिंह हे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जायचे. त्यावेळी ते सोबत सचिन वाजेलाही घेऊन जात होते.  यावर अनेक वरिष्ठ अधिकार्या़नी आक्षेपही घेतला होता.

हेही वाचा...

ज्या वेळी वाझे हे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत अँन्टिलिया स्फोटक प्रकरण आणि फेक टिआरपी केस मध्ये पत्रकार अर्नब गोस्वामी याच्या अटकेनंतर गुन्हया़ची माहिती देण्यासाठी जायचे, त्यावेळी वाझे आणि अनिल एकमेकांना ओळखत नव्हते. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया प्रकरणाची माहिती घेण्यासाठी संबधित तपास अधिकार्याला बोलवलेले होते. त्यावेळी वाजे देशमुखा़च्या बंगल्यावर आला होता. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांच्यात ज्ञानेश्वरी या  बंगल्यावर गुन्ह्याच्या माहिती देण्यासाठी इतर अधिकार्यांसोबत भेटायचे. या  व्यतिरिक्त इतर कुठलिही बैठक झाली असल्याबाबतचे पुरावे नाहीत. सचिन वाझेची  गृहमंत्री अनिल देशमख याच्यासोबत पोलिस आयुक्त परमबिर सिंहसोबत असताना.  वर्षा बंगल्यावर फक्त दोनचं वेळा भेट झाली होती. पहिल्यांदा पहिल्यांदा अर्णब गोस्वामी याला अटक केल्यानंतर तर दुसऱ्यांदा ज्यावेळी अँन्टिलिया स्फोटक प्रकरण समोर आले म्हणजेच फेब्रुवारी 2021 च्या शेवटच्या आठवडयात अनिल देशमुखा़चे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांनी वाजेकडे आँर्केस्ट्रा, बार, पब याच्या मालकाकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मागितल्याबाबतचे पुरावे आढळून आलेले नाहीत.

एसीपी संजय पाटील व डीसीपी राजू भुजबळ यांनी देखील त्याच्या जबाबात कुठल्याही प्रकारे कलेक्शनसाठीचे आदेश हे गृहमंत्री आणि पालांडे यांनी दिले नव्हते. सचिन वाझे केव्हाही एकटा देशमुखाना भेटलाच नाही. सचिन वाझे ज्या वेळी देशमुखा़ंना भेटायला त्या वेळी पोलिस आयुक्त परमबिर सि़ंह सोबत होते.

सह पोलिस आयुक्त गुन्हे विभाग या़ंनी वाझेची बदली सीआययू विभागात केली मात्र त्यांना पोलिस आयुक्त सिंह याचे आदेश होते. सीबीआयकडे सचिन वाझेला वेळो वेळी सहकार्य करणे. आदेश देण्याबाबतचे बहुतांश पुरावे सीबीआयकडे आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com