महाराष्ट्रात मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल : जयंत पाटील

कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
Jayant Patil Wearing Black Ribbon
Jayant Patil Wearing Black Ribbon

मुंबई  : महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला जातो आहे. आज काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला. जयंत पाटील यांनीही काळी फीत लावून कामकाज केले. 

कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यातील जनता सीमा भागात अडकलेल्या लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असली तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अत्याचार थांबलेला नाही त्याचाही निषेध करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, काळ्या दिनी मोठ्या संख्येने एकवटणाऱ्या मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरू करण्यात आली असून ठिकठिकाणी निषेध करणाऱ्या मराठी भाषिकांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे.  दरवर्षी काळ्या निषेध फेरी काढण्यात येत होती. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याचे कारण पुढे करीत फेरीला परवानगी नाकारण्यात आल्याने मराठी भाषिकांनी विविध भागात निषेध करण्यास सुरवात केली आहे. 

मात्र शिवसेनाच्या कार्यालयासमोर निषेध करण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकाना पोलिसांनी अडवत निषेध नोंदविण्यास विरोध करण्यात आला त्यामुळे शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच धरणे आंदोलन करण्यात येणाऱ्या मराठा मंदिर येथेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. तरीही या ठिकाणी मराठी भाषिक अधिक संख्येने जमण्यास सुरुवात झाली आहे.

काळ्या दिनी मराठी भाषिकांनी काळे फुगे व पतंग सोडण्याचा निर्णय घेतला होता याची धास्ती घेतलेल्या पोलिसांनी शनिवारी दिवसभर फुगे व पतंग विक्री करणाऱ्या विक्रत्यांना तंबी देत फुगे विक्री करण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे फुग्यांची धास्ती घेण्यात आल्याचे दिसुन आले.  कर्नाटक सरकारने काळ्या कपड्यांचा धसका घेतला आहे. काळे कपडे परिधान करुन 1 नोव्हेंबर रोजी सायकल फेरी काढण्यावर बेळगाव पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. शिवाय कोणत्याही प्रकारचे फलक प्रदर्शित करण्यावरही बंदी आणली आहे.

बेळगावसह सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला जातो. यावेळी मराठी भाषिक काळे कपडे परिधान करुन, दंडाला काळ्या फिती बांधून मूक सायकल फेरी काढतात. पण यावेळी काळे कपडे परिधान न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी युवा कार्यकर्त्यांना पाठविलेल्या नोटीशीत हा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच असा लेखी आदेश बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com