अनिल देशमुखांवर कठोर कारवाई करण्यास सीबीआयला मोकळीक

परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्बमधून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
Bombay High Court refuses to give interim protection to Anil Deshmukh
Bombay High Court refuses to give interim protection to Anil Deshmukh

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात सीबीआयकडून (CBI) देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी नुकतीच उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. पण उच्च न्यायालयाकडून देशमुखांना दिलासा मिळालेला नाही. (Bombay High Court refuses to give interim protection to Anil Deshmukh)

परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्बमधून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. १०० कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं या घटनेची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, असे आदेश दिले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच सीबीआयने १०० कोटींच्या खंडणीप्रकरणी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर छापे टाकत अनेक कागदपत्र आणि पुरावे जप्त केले होते. याच आधारावर सीबीआयकडून अनिल देशमुखांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. हा गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख उच्च न्यायालयात गेले आहेत. 

उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या याचिकेवर सीबीआयने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. सीबीआयला चार आठवड्यांनी आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर होणार आहे. तसेच न्यायालयाने देशमुखांना सीबीआय कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे देशमुखांवर सीबीआय कारवाईची टांगती तलवार कायम राहिली आहे. या आदेशाने देशमुखांवर कारवाई करण्यास सीबीआयला मोकळीक मिळाली आहे. उच्च न्यायालयाने देशमुखांना सुट्टीच्या न्यायालयात जाण्याची मुभाही दिली आहे.  
 
दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधील सर्व आरोप चुकीचे आहेत आणि आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही त्यामुळे ही एफआयआर लवकरात लवकर मागे घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका देशमुखांनी दाखल केली आहे. देशमुख यांची सीबीआयकडे चौकशी गेल्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते आक्रमक झाले होते. 

सीबीआयकडून खंडणी वसुली प्रकरणाची तपासणी सुरू आहे. यामध्ये शिवसेना नेते अनिल परबही सहभागी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे सीबीआयकडून त्यांचीही चौकशी केली जाईल, असा दावाही भाजपकडून कऱण्यात आला आहे. मात्र, अद्याप सीबीआयने परब यांना चौकशीसाठी बोलावले नाही. तसेच त्यांच्याविरूध्द अद्याप कोणती कारवाईही केलेली नाही.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com