In BJP, Vikhe, Rane, Pichad, Ganesh Naik, Mahadik are at the organizational level. | Sarkarnama

भाजपमधे संघटना पातळीवर विखे, राणे, पिचड, गणेश नाईक, महाडिक हे अयाराम उपरेच!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

ज्येष्ठांना विशेष निमंत्रितांच्या मंडळात
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,विनोद तावडे,शिवाजीराव नाईक यासारख्या नेत्यांना विशेष निमंत्रितांच्या   मंडळात समाविष्ट केले आहे. यामधे निलेश राणे यांचा समावेश केला आहे.

मुंबई : राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश भाजप कार्यकारिणीची यादी जाहीर केली असून इतर पक्षातून आलेल्या मातब्बर नेत्यांना पक्षपातळीवर संघटनेत स्थान दिलेले नाही.भाजपच्या या रणनितीमुळे भाजपत अयाराम उपरेच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपच्या या धोरणामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांची दोन मुले, बेलापूरचे गणेश नाईक कुटूंब,नगरचे पिचड कुटूंबिय तर कोल्हापूरचा महाडिक परिवार आदी राजकीय नेत्यांना भाजपने संघटनेत स्वीकारले नाही.
 राज्य भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये 12 प्रदेश उपाध्यक्ष, 6 प्रदेश सरचिटणीस व 12 चिटणीस यांचा समावेश आहे. 

त्या शिवाय सात मोर्चा आणि 18 विविध प्रकोष्ठाची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असल्यातरी अयारामांना पक्षीय पातळीवर संधी देण्यात आलेली नाही.

केंद्रात 2014 मधे नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपमधे प्रवेश करण्यचा सपाटा लावला होता.तो सिलसिला राज्यातही 2019 च्या विधानसभा निवडणुका होऊन राज्यात सरकार स्थापन होण्यापर्यत सुरूच होता. 

105 आमदार निवडून आलेल्या भाजप या पक्षाला सत्तेबाहेर बसावे लागले आहे.तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेलाच सत्ता मिळणार या अंदाजामुळे इतर पक्षातील अनेक दिग्गज भाजपमधे गेले होते.या दिग्गजांना पक्षात संघटना पातळीवर स्थान मिळेल अशी चर्चा असताना मातब्बर नेत्यांना तसेच त्यांच्या मुलांना पक्षाने संधी दिली नाही.

त्यामुळेच नारायण राणे,गणेश नाईक,विजयसिंह मोहिते,आमदार राधाकृष्ण विखे,खासदार सुजय विखे,खासदार संजयकाका पाटील,मधुकरराव पिचड,वैभव पिचड,शरद गावीत,हिना गावीत, संजय सावकारे, संजय काकडे,किसन कथोरे, खासदार उदयनराजे भोसले,आमदार शिवेंद्र भोसले,आमदार जयकुमार गोरे,माजी खासदार धनंजय महाडिक यासह अनेक नेत्यांकडे भाजपने संघटनात्मक पातळीवरील जबाबदारी टाकली नाही.

 बाहेरून आलेल्यावर काही अपवाद वगळता पक्षाने विश्वास दाखवला नाही. अपवादामधे आमदार प्रसाद लाड ,राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपने उपाध्यक्ष हे पद दिले आहे. तर राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी विशेष निमंत्रित म्हणून बोळवण केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख