BJP Should Make Agiations against Central Government Say Nitin Raut | Sarkarnama

भाजपने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे - नितीन राऊत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 जुलै 2020

भाजपा वीज बिले चुकीची आली त्याबाबत आंदोलन करते आहे. हे योग्य नाही.  केंद्र सरकार जी मदत देणार होती ती दिलेली नाही,  त्यामुळे भाजपाने केंद्राच्या विरोधात आंदोलन करावे, असा टोला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे

मुंबई : भाजपा वीज बिले चुकीची आली त्याबाबत आंदोलन करते आहे. हे योग्य नाही.  केंद्र सरकार जी मदत देणार होती ती दिलेली नाही,  त्यामुळे भाजपाने केंद्राच्या विरोधात आंदोलन करावे, असा टोला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे. 

मोठ्या रकमेच्या वीजबिलांबाबत ते म्हणाले, "महावितरण सुद्धा दुसऱ्याचे ग्राहक आहे. महाजेनको, खासगी कंपन्यांकडून आम्ही वीज विकत घेतो. कोळसा विकत घेतो, कर्ज घ्यावे लागते. एक उद्योजक म्हणून आम्ही काम करतो. कोरोना युद्ध लढताना नागरिकांवर संकट कोसळले म्हणून आम्ही काही निर्णय केले. एमईआरसीनेही काही निर्देश दिले. वीज बीले तीन महिन्यांचे एबीसी अशी बीले आहेत. मागच्या वर्षी मार्च, एप्रीलची तुलना कराल, तर प्रत्येकाने वीज वापरली आहे. टीव्ही, वर्क फ्राॅम होम होते. उन्हाळा होता. वीज जास्त खर्च झाली आहे. हे नाकारता येणार नाही,''

ते पुढे म्हणाले," आम्ही लोकांना सवलत दिली आहे. जी घरे  बंद होती तिथे वीजबिल नव्यान दिले जाणार आहे. वीजबिल हप्ते भरताना वेळ ही दिला जाईल, वीजबिलात २ टक्के सूट असेल. वीज कट करू नये या सूचना आम्ही दिल्या आहेत.  मात्र, लोकांनी वीज बिल भरणे गरजेचे आहे. मुंबई आणि राज्सात जर वीजबिल भरले नाही म्हणून लाईट कट केले जात असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,''

महाआघाडीत सुरु असलेल्या कुरबुरीबाबत ते म्हणाले, "कुणीही कुणाची मानहानी करत नाही. मुख्यमंत्र्यांशी रोज चर्चा होते आहे. मंत्रीमंडळात चर्चा होते. आमचे नेते, अध्यक्ष बोलत आहेत. मानहानी कुणाची आणि कुणी केली. दरेकरांना वाटत असेल की फडणवीस आपल्याशी संपर्क करत नाहीत म्हणून आपली मानहानी होते आहे. आमच्यात संवाद आहे. मुख्यमंत्री चर्चा करताहेत. आम्ही समान किमान कार्यक्रमावर लोकांची कामे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे भाजपला आव्हान आहे की आमचे सरकार पाडून दाखवावे."

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख