नारायण राणे कोरोना पाॅझिटिव्ह

भाजपचे खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कोविड चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे राणे यांनी ट्वीट करुन कळवले आहे
Narayan Rane Corona Positive
Narayan Rane Corona Positive

मुंबई : माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असे भाजपचे खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ट्वीटरद्वारे कळवले आहे.

२७ सप्टेंबरला भाजपचच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उमा भारती ऋषिकेश आणि हरिद्वार परिसरातील एका ठिकाणी क्वारंटाइन झाल्या आहेत. २९ सप्टेंबरला उपराष्ट्रपदी व्यंकय्या नायडू हे देखिल कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या महिन्याच्या सुरवातीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पॉझिटिव्ह सापडले होते. याचबरोबर केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कर्नाटकातील भाजपचे खासदार अशोक गस्ती आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

दोन दिवसांपूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी  स्वतः ट्‌वीट करत माहिती दिली होती. माझ्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती त्यांनी त्यात दिली होती.
गेले अनेक दिवस मंत्री सामंत शासकीय कार्यक्रमापासून अलिप्त आहेत. ते, जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधुन कोरोनाचा आढावा घेत होते. 
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com