...म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार? ः आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका 

'मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार; मग मदतीचे पॅकेज देणार..! आमच्या कोकणी भाषेत "म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?' असे ट्विट भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.
Bjp Mla Ashish Shelar criticizes the Chief Minister
Bjp Mla Ashish Shelar criticizes the Chief Minister

पुणे ः "मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार; मग मदतीचे पॅकेज देणार..! आमच्या कोकणी भाषेत "म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?' असे ट्विट भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "फेसबुक लाइव्ह'द्वारे नुकताच संवाद साधला. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "तुम्ही विरोधी पक्षात होतात, त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात, ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करून दाखवा!' असेही शेलार यांनी म्हटले आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी "फेसबुक लाइव्ह'दरम्यान केले होते. त्यावरही शेलार यांनी टिका केली आहे."राजकारण करू नका हे नेमकं कुणाला सांगताय? खासदार संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना का? कारण, ते खासगीत ऐकत नाहीत; म्हणून असे सार्वजनिक सांगताय का? काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही.' असे आमदार शेलार यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

"एकदा म्हणता पावसाळ्यापूर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करू...आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार...एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत...आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत...रोज भाषण, दिशा बदलतंय! 
आता बोलून नको, करून दाखवा! अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर, करदाते..या सर्वांना आता काही तरी मदत करावी, असे वाटत नाही का? 

हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेतले जात नाही. रुग्णवाहिका, खाटा नाहीत...निष्पाप जीव जात आहेत. नुसते भाषण नको...आता तरी करून दाखवा!' असे आमदार शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 

सचिन सावंत, तुम्ही आता उठाबशा काढा ः शेलार 

पुणे : कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या आंदोलनावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की "मशीनच्या मदतीने तुम्ही कितीही ट्विट केले तरी "महाराष्ट्र बचाओ' हेच दिवसभर ट्विटरवर क्रमांक एकवर ट्रेण्डींग होते. उगाच तुमच्या इंटरनेट निरक्षरतेचे लाजिरवाणे दर्शन का घडवताय?' असा प्रश्न करीत सावंत यांचा समाचार घेतला. 

सचिन सावंत यांनी शुक्रवारी टीका करताना, "महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटाशी लढत असताना सत्तेकरिता हपापलेल्या भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचे राजकीय रणांगण करण्याचा प्रयत्न राज्यातील सूज्ञ जनतेने हाणून पाडला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे सुरू केलेल्या #ष्ट्रद्रोहीBJP' या ट्‌विटर ट्रेंडला उस्फूर्त प्रतिसाद देऊन भाजपचा "महाराष्ट्रद्रोही' चेहरा उघडा पाडला आहे, अशा शब्दांत आंदोलनाची खिल्ली उडवली होती. 

ही टीका भाजप कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे शेलार यांनी सावंत यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. चोवीस तास खोटे बोलणारे आज उताणे पडले.."महाराष्ट्र बचाव' ला ट्विटवर काय प्रतिसाद मिळाला, याचा हा घ्या पुरावा...! खोटारडे सावंत तुम्ही, आता कान धरून उठाबशा काढा आणि तातडीने प्रेसनोट मागे घ्या! अशी मागणी शेलार यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com