...या तर चोराच्या उलट्या बोंबा : राम कदमांची हसन मुश्रीफांवर टीका - BJP Leader Ram Kadam Targets NCP Leader Hassan Mushriff | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

...या तर चोराच्या उलट्या बोंबा : राम कदमांची हसन मुश्रीफांवर टीका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

''राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष पेटलाय त्यामुळे, आमदारांची नावे नक्की होत नसल्याचे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याने कालच सांगितले. तो असंही म्हणाला की, हसन मुश्रीफांना पक्षात काय चाललंय ते माहीत नसावं? नावे राज्यपालांकडे न पाठवता दोष त्यांनाच द्यायचा? या तर चोराच्या उलट्या बोंबा,'' अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

मुंबई : ''राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष पेटलाय त्यामुळे, आमदारांची नावे नक्की होत नसल्याचे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याने कालच सांगितले. तो असंही म्हणाला की, हसन मुश्रीफांना पक्षात काय चाललंय ते माहीत नसावं? नावे राज्यपालांकडे न पाठवता दोष त्यांनाच द्यायचा? या तर चोराच्या उलट्या बोंबा,'' अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्‍त १२ जागांसाठीच्या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करणार आहे. या नावांची उत्सुकता कायम असली तरी त्यावरुन गदारोळ सुरू  झाला आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिमंडळाने दिलेली नावे बाजूला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.

''माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले.  त्यावेळी कोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने गेले होते. या ठिकाणी काही वेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे दाखल झाले. सांत्वन केल्यानंतरच पाचच मिनिटात त्यांनी राज्यपालांकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांबाबत धाडसी वक्‍तव्य केले होते,'' असे मुश्रीफ म्हणाले होते. 

''मंत्रिमंडळाने १२ नावांची शिफारस केली तरी ही नावे बाजूला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आमदार कोरे तुम्ही काही काळजी करु नका, असा सल्ला या वेळी  पाटील यांनी दिला. मात्र, काही वेळाने  पाटील यांना त् ठिकाणी भैय्या माने उपस्थित असल्याचे ध्यानात आल्यानंतर त्यांनी सारवासारव  केली," असाही दावा मुश्रीफ यांनी केला होता.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख