‘मातोश्री’चे नाव ‘लॉकडाउन’ करा...

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता राज्यात लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवादही साधला होता. लॉकडाउनच्या निर्णयासंदर्भात नीलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले
Nilesh Rane - Uddhav Thackeray
Nilesh Rane - Uddhav Thackeray

रत्नागिरी : मुख्यमंत्री राज्याला भिकेला लावणार, या मुख्यमंत्र्याला लॉकडाउनशिवाय काहीच दिसत नाही. त्यांचा पहिला, मधला आणि शेवटचा उपाय हा लॉकडाउनच आहे. ते लॉकडाउनशिवाय काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आता ‘मातोश्री’चे नाव बदलून ‘लॉकडाउन’ करा, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे Nilesh Rane यांनी केली आहे. Nilesh Rane - Uddhav Thackeray

कोरोनाचे Corona रुग्ण वाढत आहेत. आता राज्यात लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवादही साधला होता. लॉकडाउनच्या निर्णयासंदर्भात नीलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना Uddhav Thackeray लक्ष्य केले. ते म्हणाले, कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. मुख्यमंत्र्यांना काही कळते की नाही हेच मला समजत नाही. लॉकडाउन केले तर राज्यातील नागरिक कोरोना नव्हे तर भुकेने मरतील. लॉकडाउनचे नियम कोण तयार करते, हेच कळत नाही. 

ते पुढे म्हणाले, "कोरोनाच्या नावावर अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. सध्या महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्याची Pune वाट लावली आणि तेच पंढरपूरला Pandharpur सभा घेतात. ही परिस्थिती अशीच राहिली तर लोक रस्त्यावर उतरून मारतील. नुकतीच झालेली कोरोनाची बैठक ही मंत्र्यांना वाचवण्यासाठीच होती. मंत्री अडचणीत आले की कोरोना वाढतो. ॲड. अनिल परबही Anil Parab यामधून वाचू शकत नाहीत.'' हे सरकार कुणीही पाडायची गरज नाही, ते आपसूकच पडेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. BJP Leader Nilesh Rane Criticism on Uddhav Thackeray over Lock Down

जनहित याचिका दाखल करणार
कोरोना कालावधीत आरोग्य सुविधा नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. सुविधा देणे ही निश्‍चित सरकारची जबाबदारी आहे. हा एकप्रकारे हलगर्जीपणा आहे. या विरोधात येत्या काही दिवसात जनहित याचिकाही दाखल करणार असल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.

Edited By -  Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com