'औरंगझेब, वाघ, कोथळा..' या पलीकडे भाषणात काय? भाजपचा ठाकरेंना सवाल - BJP Criticized Sena Chief Uddhav Thackeray over Dassra Speech | Politics Marathi News - Sarkarnama

'औरंगझेब, वाघ, कोथळा..' या पलीकडे भाषणात काय? भाजपचा ठाकरेंना सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

दसरा मेळाव्यात तरी तरी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे किमान शिवसैनिकांसमोर बोलताना तरी त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी देतील, असे वाटले होते, मात्र त्यांच्या भाषणाचा सर्व वेळ हा केंद्र सरकार वर आणि भाजपा वर टीका करण्यात घालवला, अशी टीका भाजपचे प्रवक्त केशव उपाध्ये यांनी केली आहे.

मुंबई  : दसरा मेळाव्यात तरी तरी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे किमान शिवसैनिकांसमोर बोलताना तरी त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी देतील, असे वाटले होते, मात्र त्यांच्या भाषणाचा सर्व वेळ हा केंद्र सरकार वर आणि भाजपा वर टीका करण्यात घालवला, अशी टीका भाजपचे प्रवक्त केशव उपाध्ये यांनी केली आहे.

''शिवसेनिकांना भावनिक साद घालण्यापलीकडे ठाकरेंच्या भाषणात काहीच नव्हते. औरंगजेब, वाघ, कोथळा, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही... या भाषेपलीकडे काहीच नव्हते. हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा अनेक वर्षे  करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच; पण ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेली अवाक्षर न काढणारे आज उध्दव ठाकरे यांना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काव्यागत न्याय आहे,'' शिवसैनिकांसमोर सुध्दा सरकारचे काम सांगण्यासारखे त्यांच्याकडे ठोस काही नसावे. पुढच्या महिन्यात काम सांगणार अस सांगून सर्व भाषणाचा वेळ घालवला, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.

उपाध्ये पुढे म्हणतात, "महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासलाय  असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. पण त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रूपये देऊन चेष्टाच केली आहे. जीएसटी संदर्भात केंद्राने दिलेला प्रस्ताव देशातील २० पेक्षा अधिक राज्यांनी स्वीकारला व ते पुढे गेले. मात्र राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यात कोणताही रस नाही,'' 

"कोरोना हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयश आले आहे. राज्यातील कोणत्याही घटकास सरकारने दिलासा दिलेला नाही. अशा वेळी किमान आज शिवसैनिकांसमोर बोलताना तरी काही ठोस उध्दव ठाकरे हे सांगतील, अशी अपेक्षा होती. कोरोना कालात मुख्यमंत्री कुठे बाहेर पडले नाहीत. देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. पीपीई किट घोटाला झाला. महिलांवर अत्याचार वाढले त्याबद्दल उध्दव ठाकरे याबद्दल काही बोलले नाहीत,'' अशीही टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख