कांदा जीवनावश्‍यक वस्तूत टाकणारा महामूर्ख शोधला पाहिजे ः बच्चू कडू 

केंद्र सरकार जीवनावश्‍यक वस्तूंमधून कांदा वगळणार असल्याची माहिती समजली आहे. त्याबद्दल प्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन करतो. पण, कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये टाकणारा महामूर्ख कोण आहे, त्याला शोधले पाहिजे
Bachchu Kadu criticizes onion including essentials
Bachchu Kadu criticizes onion including essentials

अमरावती ः केंद्र सरकार जीवनावश्‍यक वस्तूंमधून कांदा वगळणार असल्याची माहिती समजली आहे. त्याबद्दल प्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पण, कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये टाकणारा महामूर्ख कोण आहे, त्याला शोधले पाहिजे, अशी टीका राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केली. 

केंद्र सरकार कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमधून वगळण्याचा विचार करीत आहे, यावर प्रतिक्रिया देताना राज्य मंत्री कडू बोलत होते. ते म्हणाले की, कांदा खाल्ला नाही, तर लोक मरतात, असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम म्हणून राहील. कांदा निर्यातीला सरकारने अनुदान दिली पाहिजे. कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमधून काढून त्याला अनुदान दिले पाहिजे, अशी मागणीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी बोलताना केली. 


कांदा, बटाटा, तेलबिया, धान्य, दाळींची अत्यावश्‍यक वस्तू कायद्याच्या कचाट्यातून सुटका 

पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी कृषी क्षेत्रातील तीन सुधारणांसह 11 कलमी कार्यक्रम जाहीर केला. 

सीतारामन यांनी अत्यावश्‍यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असे जाहीर केले. या सुधारणांतर्गत कांदा, बटाटा, खाद्यतेल, तेलबिया, धान्य, दाळींची अत्यावश्‍यक वस्तू कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार आहे. 

शेतमालाला जास्तीत जास्त चांगला भाव मिळण्यासाठी कृषी पणनमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सुधारण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे सीतारामन यांनी सांगितले. कृषी 
शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कृषी क्षेत्रातील या तीन सुधारणांसह अर्थमंत्री सीतारामन यांनी कृषी क्षेत्राला संजीवनी देणारे पुढील निर्णय जाहीर केले : 

1. शेतमाल ठेवण्यासाठी शीतगृह, साठवण गृह आदी कृषी क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपये 

2. समूहावर आधारित कृषी उद्योगांसाठी 10 हजार कोटी रुपायांची मदत मायक्रो फूड उद्योगांसाठी करण्यात येणार. उदाहरणार्थ काश्‍मीरमध्ये केसर, बिहारमध्ये मकाना, आंध्र प्रदेशमध्ये मिरची, तेलंगणामध्ये हळद, कर्नाटकामध्ये रागी, तमिळनाडूमध्ये सागी उत्पादकांनी एकत्र येऊन मायक्रो फूड उद्योग स्थापन करता येईल 

3. मत्स्य व्यावसायाला चालना देणअयासाठी 20 हजार कोटी रुपये. 

4. राष्ट्रीय प्राणी रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी 13 हजार 343 कोटी रुपये - या कार्यक्रमांतर्गत पशुधनाचे 100 टक्के लसीकरण करण्यात येईस. आतापर्यत दीड कोटी गाया आणि म्हशींचे लसीकरण झाले आहे. गुरे, म्हसी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे आदी 53 कोटी पशुधानाला रोगप्रतिबंधक लस टोचवण्यात येणार. 

5. पशुसंवर्धनासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 15 हजार कोटींची मदत. 

6. वनौषधींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी चार हजार कोटी रुपये देणार. गंगा नदीच्या दोन्ही बाजूंनी वनौषधींची लागवड करण्यात येणार आहे. 

7. मधमाशा पालनासाठी 500 कोटीं साह्य. याचा दोन लाख मधमाशा पालनकर्त्यांना फायदा होणार आहे. 

8. टॉप टू टोटल योजना ः या योजनेसाठी 500 कोटी रुपये अर्थसाह्य मिळणार. यामध्ये 50 टक्के अनुदान शेतमालाच्या वाहतुकीवर, तर 50 टक्के अनुदान साठवणुकीवर मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com