आठवले म्हणतात, 'महाविकास आघाडी सरकारने कोकणाची उपेक्षा केली' 

निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणवासियांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. त्या मदतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
Athavale says, 'Mahavikas Aghadi government neglected Konkan'
Athavale says, 'Mahavikas Aghadi government neglected Konkan'

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणवासियांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. त्या मदतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

मागील महिन्यात 3 जून रोजी निसर्ग चक्री वादळाने कोकणाला तडाखा दिला होता. त्यात कोकणवासियांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यापैकी बहुतांश ठिकाणी अद्याप मदत पोचली नाही. त्यामुळे राज्य सरकारबाबत कोकणवासियांनी बाळगलेल्या अपेक्षांचा भंग झाला आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

निसर्ग चक्री वादळामुळे घरांचे नुकसान झलेल्यांना राज्य सरकारने केवळ दीड लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ती रक्कम अत्याल्प असून त्यात वाढ करून 3 लाख रुपये घर बांधणीसाठी द्यावेत. तसेच, या वादळात रायगड जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासियांना केवळ 4 लाख रुपये सांत्वनपर मदत म्हणून देण्यात आले आहेत. त्यात वाढ करून 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी. घरांची अल्प प्रमाणात पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना केवळ 15 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यात वाढ करून 40 हजार रुपये मदत देण्यात यावी. 

भातशेती सारख्या पिकास हेक्‍टरी 50 हजार रुपयांची अल्प मदत जाहीर करण्यात आली असून त्यात वाढ करून त्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाईपोटी मदत देण्यात यावी. तसेच आंबा, सुपारी, नारळ या बागांना वृक्षनिहाय नुकसान भरपाई देण्यात यावी. बागांची नुकसान भरपाई देताना केवळ एक वर्षाचा विचार न करता वृक्षनिहाय किमान 3 वर्ष ते 10 वर्षांचा विचार करून बागांची नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी. 

निसर्ग चक्री वादळाने कोकणाला तडाखा देऊन एक महिना झाला तरी अद्याप वादळग्रस्तांना पुरेशी मदत न मिळणे म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोकणवासिय चक्री वादळग्रस्तांची उपेक्षा करीत असल्याचे द्योतक आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर केला आहे. 
 

मंजूर निधी वेळेत आणि पूर्णपणे खर्च करा : अजित पवार 

बारामती : चालू आर्थिक वर्षात ज्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करा. विविध विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या हवामानात टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी, आसपासचा परिसर सुशोभित करावा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटावे, अशा प्रकारचे वातावरण असावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 4 जुलै) बारामती येथे विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या विकास कामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. 

अजित पवारांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची, माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रीडा संकुल, गौतम बाग येथे सुरू असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करत आवश्‍यक सूचना केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com