'त्यांच्या' ज्येष्ठत्वाचे भान ठेवा : आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

शरद पवार सोमवारी (ता. ६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर गेले. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख हेही होते. या भेटीबाबत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत ट्वीट केले आहे
Ashish Shelar Comments on Sharad Pawar Uddhav Thackeray Meet
Ashish Shelar Comments on Sharad Pawar Uddhav Thackeray Meet

मुंबई : कुणाला किती वेळा, कुठे भेटावे, हा विषय 'त्यांचा' असला तरी असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात 'मातोश्री'वर झालेल्या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष चिमटा काढला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बैठकीसाठी 'मातोश्री'वर गेले होते. तो संदर्भ घेऊन शेलारांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले आहे. 

महाविकास आघाडीतल्या शिवसेना व राष्ट्रवादीत सुरू झालेल्या राजकीय कुरघोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिष्टाई केली होती. गृहविभागाने मुंबईतील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. तर, पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर कल्याण व अंबरनाथ पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले होते. यावरून महाविकास आघाडीतल्या या दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात मार्ग काढण्यासाठी  शरद पवार सोमवारी (ता. ६)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर गेले. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख हेही होते.

या भेटीबाबत आज शेलार यांनी एक ट्वीट केले आहे.....
कुणाला किती वेळा, कुठे भेटावे?हा विषय त्यांचा असला तरी...
आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो...त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते!
इथे याबाबत 'आनंदीआनंदच' आहे!..

असा चिमटा त्यांनी काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com