....अर्जुन रामपाल देशाबाहेर पळून जाणार होता!

ड्रग्ज तस्करी प्रकरणात अर्जुन रामपाल परदेशात पळण्याच्या तयारीत होता, असा धक्कादायक खुलासा NCBच्या चार्जशीटमधून झाला आहे. .परदेशात जाण्यासाठी रामपालने साऊथ अफ्रिकेतील काऊन्सलेट जनरलसोबत पत्रव्यवहार केला होता, असेही समोर आले आहे.
Arjun Rampal
Arjun Rampal

मुंबई : ड्रग्ज तस्करी प्रकरणात अर्जुन रामपाल परदेशात पळण्याच्या तयारीत होता, असा धक्कादायक खुलासा NCBच्या चार्जशीटमधून झाला आहे. .परदेशात जाण्यासाठी रामपालने साऊथ अफ्रिकेतील काऊन्सलेट जनरलसोबत पत्रव्यवहार केला होता, असेही समोर आले आहे. Arjun Rampal Tried to Escape From India NCB Charge sheet Explains

सुशांत सिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आत्महत्या प्रकरणानंतरअर्जुन रामपाल NC रडारवर आला होता. याची कुणकुण लागताच रामपाल (Arjun Rampal) परदेशात पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. एनसीबीने साऊथ अफ्रिकेच्या (South Africa) काऊन्सलेटला पञ व्यवहार करून याची कल्पना दिली. सुशांत राजपूत आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात रामपालच्या घरातून काही नशेसाठी वापरली जाणारी औषधे एनसीबीने जप्त केली होती. 

या प्रकरणी एनसीबीने रामपालला दोन वेळा चौकशीला बोलावले होते. चौकशीत दोन औषधे एनसीबीला मिळाली होती. त्यातील एक कुत्र्यांसाठी वापरले जाणारे औषध होते. त्याचे प्रिस्क्रिपशन मिळाले. तर दुसरी टॅबलेट ही त्याच्या बहिणीची असल्याचं म्हटलं जात आहे.
Edited By  - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com