अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा परिसर सील - Area Near Amitabh Bacchan Residence in Juhu Sealed | Politics Marathi News - Sarkarnama

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा परिसर सील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 जुलै 2020

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच अभिषेक बच्चन याचीही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. तसेच बच्चन यांचा बंगला आणि कार्यालय हा परिसर सील करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाऊन या परिसरात फवारणी केली आहे.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना तीन दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणास्तव नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पाॅझिटिव्ह आली आहे. अमिताभ यांनी स्वःतच ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. दरम्यान बच्चन यांच्या बंगल्याचा परिसर सील करण्यात आल्या असून महापालिकेने त्यांच्या बंगल्याच्या परिसरात जंतूनाशक फवारणी केली आहे.

त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अन्य कर्मचाऱ्याचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. तो उद्या येण्याची शक्यता आहे. अमिताभ यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची तब्येत ठिकठाक असल्याचे सांगण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन नेहमीच्या चेकअपसाठी नानावटी रुग्णालयात दाखल होतात. या वेळी तीन दिवसांपूर्वी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पाॅझिटिव्ह आलीआहे. त्यांना गेल्या दहा दिवसांमध्ये भेटलेल्या सगळ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यात आली आहे. 

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच अभिषेक बच्चन याचीही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. तसेच बच्चन यांचा बंगला आणि कार्यालय हा परिसर सील करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाऊन या परिसरात फवारणी केली आहे. आजूबाजूचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. अन्य मंडळींचा कोरोना अहवाल उद्या येणार आहे. 

Edited BY - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख