कोव्हिड हाताळणीत अपयशी ठरविण्यात आलेले प्रवीण परदेशी 'युनो'त 

मुंबई शहरातील कोव्हिड परिस्थिती हाताळणीबाबत अपयशी ठरवून मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून दूर करण्यात आलेले प्रवीण परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाने असंसर्ग आजार समितीचे समन्वयक नेमले आहे.
Appointment of Praveen Pardeshi in UNO
Appointment of Praveen Pardeshi in UNO

मुंबई : मुंबई शहरातील कोव्हिड परिस्थिती हाताळणीबाबत अपयशी ठरवून मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून दूर करण्यात आलेले प्रवीण परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाने असंसर्ग आजार समितीचे समन्वयक नेमले आहे.

परदेशी सध्या नगरविकास विभागाचे सचिव आहेत. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याला परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. ती परदेशी यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे परदेशी लवकरच नवी जबाबदारी स्वीकारतील. 

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात अत्यंत कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी यांची ओळख होती. मुंबई शहरातील कोव्हिड हाताळण्यात अपयश येत असल्याचे पाहून परदेशी यांची पालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. तेव्हापासून परदेशी नाराज होते. त्यातच संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत त्यांना समन्वयक म्हणून काम देऊ केले आहे. 

भारतातील नियमानुसार कोणताही सनदी अधिकारी सात वर्षांहून अधिक काळ विदेशी संस्थांसाठी काम करू शकत नाही. परदेशी यांची आजवरची विदेशातील सेवा गृहीत धरत हा काळ मोजला जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालय, वन खाते अशी जबाबदारी सांभाळलेल्या परदेशी यांचा आपत्ती व्यवस्थापनातला अनुभव दांडगा आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात भूकंपाचा धक्का बसला होता. त्या वेळी त्यांनी तेथे केलेल्या मदत कार्याची आजही सर्वत्र दखल घेतली जाते. 

पुण्याच्या कलेक्टरची PMO मध्ये नियुक्ती
 

मुंबई :   पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनाही पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून घेण्यात आले आहे.  नवलकिशोर राम हे बिहारचे भूमिपुत्र आहेत.

सासाराम लोकसभेच्या खासदार आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नवलकिशोर राम हे भाचे आहेत.  त्यामुळे पुढील सहा महिन्यात पंतप्रधान कार्यालयातून बिहार साठी ज्या प्रकारच्या घोषणा होतील त्यामध्ये नवल किशोर राम या बिहारी भूमिपुत्र अधिकाऱ्याचा सर्वात मोठा वाटा असू शकतो, असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. 

नवल किशोर राम हे पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती चार वर्षांसाठी राहणार आहे. ते 2007 मध्ये आयपीएस झाले. त्यानंतर त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. त्यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यांनी यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची बीड आणि औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

गेली दोन वर्षे ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कोरोना संकटाच्या काळात ते जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावी फिरून काम केले. गेल्या दोन वर्षात त्यांनी दाखविलेल्या कार्यक्षमेतेची दखल फेम इंडिया - आशिया पोस्ट यांनी घेतली. त्यांची देशातील सर्वोत्तम 50 जिल्हाधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. फेम इंडिया- आशिया पोस्ट लोकप्रिय जिल्हाधिकारी सर्वेक्षण 2020 मध्ये त्यांनी स्थान पटकावले.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com