अनिल देशमुखांचे पीए संजीव पालांडे, कुंदन यांना द्यावी लागणार सीबीआयला उत्तरे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे व कुंदन या दोघांना सीबीआयच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. या दोघांनाही सीबीआयने समन्य बजावले आहे. या दोघांकडे चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवली जाणार आहेत.
Anil Deshmukh - Parambir Singh
Anil Deshmukh - Parambir Singh

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे व कुंदन या दोघांना सीबीआयच्या CBI प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. या दोघांनाही सीबीआयने समन्य बजावले आहे. या दोघांकडे चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवली जाणार आहेत. Anil Deshmukh PA Sanjiv Palande Summoned by CBI

ता. ४ मार्चला झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे यांनी डीसीपी डाॅ. राजू भुजबळ यांना २ ते ३ लाख रुपये हप्ता वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग Parambir Singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे पालांडे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर कुंदन यांनाही सीबीआयने चौकशीसाठी समन्य पाठवले आहे. 

या दोन स्वीय सहाय्यकांचे जबाब सीबीआय नोंदवणार आहे. सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग Parambir Singh यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी Anil Deshmukh सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना Sachin Waze निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. Anil Deshmukh PA Sanjiv Palande Summoned by CBI

त्यावर परमबीर सिंग यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचा आणि पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सीबीआयने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने दोन दिवसांपूर्वी अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या सचिन वाझेकडेही चौकशी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com