अनिल देशमुख बेजबाबदार गृहमंत्री : भातखळकर यांची जळजळीत टीका - Anil Deshmukh is Irresponsible Home Minister Say Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुख बेजबाबदार गृहमंत्री : भातखळकर यांची जळजळीत टीका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

राष्ट्राची बदनामी हे आघाडी सरकारच करीत आहे. राज्यातील कोरोना सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे. पुण्यात नुकत्याच झालेल्या गोळीबाराचा तपास त्यांनी करावा. इतका राजकीय स्वरुपाचा गृहमंत्री महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहायला मिळाला नाही, अशी टीका अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुखांवर केली आहे

मुंबई : अनिल देशमुख हे बेजबाबदार अन राजकीय स्वरुपाचे गृहमंत्री असून इतका राजकीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

देशमुख यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना भातखळकर यांनी देशमुख यांना हा टोला लगावला आहे. भाजप कसल्याही चौकशीला तयार आहे, मात्र भाजपने सत्तेवर असताना फोन टॅपिंग केले असे आरोप करणाऱ्या देशमुखांनी त्या चौकशीचे काय झाले हे जाहीर करावे, असेही भातखळकर यांनी विचारले आहे. 

देशमुख यांनी भाजप वर खोटे आणि राजकीय आरोप केले असून हे खोटे आरोप करणाऱ्या देशमुख यांचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत आहे. तुम्हाला जी चौकशी करायची असेल ती बेशालक करा, भाजपने किंवा देवेंद्र फडणवीस यांनी केव्हाही कोणतेही बेकायदा काम केले नाही किंवा करतही नाहीत. भाजप सत्तेवर असताना त्यांनी फोन टॅपिंग केले होते व त्याची चौकशी करू असा दावा देशमुख यांनी यापूर्वी केला होता. त्या चौकशीचे काय झाले हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे, असेही आव्हान भातखळकर यांनी दिले आहे. 

अशा प्रकारे महाराष्ट्राची बदनामी हे आघाडी सरकारच करीत आहे. राज्यातील कोरोना सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे. पुण्यात नुकत्याच झालेल्या गोळीबाराचा तपास त्यांनी करावा. इतका राजकीय स्वरुपाचा गृहमंत्री महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहायला मिळाला नाही. देशमुख हे इतके राजकीय अन बेजबाबदार गृहमंत्री आहेत, अशी जळजळीत टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख