Ajit Pawar is upset with Uddhav Thackeray over this decision | Sarkarnama

अजित पवार या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 2 जुलै 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची खंत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे नेत्यांनी बोलून दाखवली असल्याचे समजते. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची खंत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे नेत्यांनी बोलून दाखवली असल्याचे समजते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 2 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. कॉंग्रेस नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली असून राज्यातील महत्वाच्या खात्यांना पैशाची गरज असल्याने त्यासंबंधी चर्चा केली जाणार आहे. 

 

दोन किलोमीटर अंतरापेक्षा जास्त प्रवास करू नका, या सरकारच्या आदेशावर जनतेमध्ये नाराजीची भावना आहे. राज्य सरकारने या नाराजीची दखल घ्यावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगण्यात आले असल्याचे समजते. सरकारमध्ये परस्पर निर्णय घेतले जात असल्याबद्दलही नाराजी असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

शिवसेनेने विशेषत: मुख्यमंत्री कार्यालयाने नोकरशाहीवर अवलंबून राहत निर्णय घेणे हे काही बरोबर नाही, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले असल्याची चर्चा आहे. 

चंद्रकांतदादा म्हणतात, "चौथीतली पोरगी सांगेल महाआघाडी सरकारचं काही खरं नाही !'' 

मुंबई : राज्य सरकारने आमच्याकडे मदत मागितली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न दोन दिवसात सोडवले असते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. 

पाटील यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो. 

सरकारला लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपापले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाऊनमध्ये ज्या बाबींवर कडक निर्बंध नव्हते. त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी करायचे तरी काय, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. 

मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का ? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही, असे ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख