'फडणवीस आयपीएस अधिकाऱ्यांना भेटले आणि आमचे मंत्री अडकू लागले' 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.
'फडणवीस आयपीएस अधिकाऱ्यांना भेटले आणि आमचे मंत्री अडकू लागले' 
Navab Malik.jpg

मुंबई : राज्यातील मंत्र्यांवर सध्या सीबीआय, ईडी आदी केंद्रीय संस्थांकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी तर ईडी 12 मंत्र्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड हे या लिस्टमध्ये 12 वे खेळाडू असल्याचे भाकीत सोमय्या यांनी केले होते.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक म्हणाले, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना लक्ष केले जात आहे. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.  

हेही वाचा...


ईडी व सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे. 

पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने ईडी व सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सर्वोच्च न्यालयानेही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपचे हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल असा इशाराही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in