मराठा समाजाच्या नाराजीनंतर गृहखात्याने पोलीस भरतीचा निर्णय बदलला...

विद्यार्थ्यांना 'एसईबीसीचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग शुद्धीपत्रक काढणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मराठा समाजाच्या एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गृहविभागाने 4 जानेवारी 2021 रोजी काढलेला शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

4 जानेवारी 2021 रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून अर्ज भरण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. अखेर तो निर्णय रद्द करण्यात आल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना 'एसईबीसीचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग शुद्धीपत्रक काढणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

गृह विभागाने 4 जानेवारीला काढलेल्या आदेशामध्ये पोलीस भरतीसाठी एसईबीसीचे आरक्षण गृहीत धरण्यात आलेले नसल्यामुळे. मराठा संघटनांनी या निर्णयाचा विरोध दर्शवला होता. त्यामुळे गृह विभागाने तो जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.

पोलीस भरती प्रक्रिया २०१९ साठी एसईबीसीच्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी आम्ही दि. ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द केला आहे. तसेच राज्य शासनाने २३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा लाभ विद्याऱ्यांना देण्यासाठी लवकरच शुद्धीपत्रक काढण्यात येईल. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्टरवर व्हिडीअो पोस्ट करून दिली. 

4 जानेवारी 2021 चा शासन निर्णय काय होता?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मराठा समाजाच्या एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गृहविभागाने आज आदेश काढत त्यांना खुल्या वर्गातून पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. जीआरनुसार 'एसईबीसी'तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाणार आहे. 'एसईबीसी'तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार. 

वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने 15 दिवसांत भरावे लागणार आहे. याबाबत पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारने केल्या होत्या.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'एसईबीसी' आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com