बाळासाहेब, उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत, संजय राऊतांनी दिली माहिती  - After Balasaheb, Uddhav Thackeray, now Sharad Pawar's marathon interview, Sanjay Raut gave the information | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब, उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत, संजय राऊतांनी दिली माहिती 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 जुलै 2020

श्री. पवार यांची मॅरेथॉन मुलाखत लवकरच सामनात प्रसिद्ध होणार आहे. तसे ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते, सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच फक्त मॅरेथॉन मुलाखती आजपर्यंत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आल्या आहेत. आता मात्र या यादीत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार हे ही आले आहेत. 

श्री. पवार यांची मॅरेथॉन मुलाखत लवकरच सामनात प्रसिद्ध होणार आहे. तसे ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते, सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी म्हटले आहे, की श्री. पवार यांची मी मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. चीनपासून ते महाराष्ट्रपर्यंतच्या घडलेल्या घटनांबाबत श्री. पवार यांनी आपले विचार या मुलाखतीत व्यक्त केले आहेत. ही मुलाखत सामना स्टाईलनेच असणार आहे आणि लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 

महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर भाजप जोरदार हल्ला चढवित आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीबाहेर पडावे असे आव्हान देतानाच महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही अशी टीका आजच राणे यांनी केला आहे. राणेंच्या टीकेला आज राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी उत्तर दिले आहे. एकूणच आघाडी सरकारची स्थापना, त्यानंतरच्या घडामोडीवर श्री. पवार काय बोलणार याकडे मात्र महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे. 

दाटीवाटीच्या परिसरात मृत्यूदर सर्वाधिक

 कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात दिवसेंदिवस वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्या असलेल्या प्रभागांमध्ये मृत्यूदर सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. यात चेंबूर, देवनार, कुर्ला, वांद्रे (पूर्व) विभागात सर्वाधिक मृत्यूदर असून तेथे झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्याही 66 टक्‍यांपासून ते 84 टक्‍यांपर्यंत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख