आजपासून मुंबईत अतिरिक्त लोकल धावणार - Additional Local Trains will run in Mumbai from Today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

आजपासून मुंबईत अतिरिक्त लोकल धावणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दळणवळणासाठी आजपासून मुंबईत ३५० अतिरिक्त लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. ही सेवा अद्याप सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. 

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दळणवळणासाठी आजपासून मुंबईत ३५० अतिरिक्त लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. ही सेवा अद्याप सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी कालच याबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, प्राप्तीकर, जीएसटी, कस्टम्स, टपाल सेवा, राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी, न्यायव्यवस्था, संरक्षण दले आणि राजभवन यांच्या कर्मचाऱ्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 

मुंबईच्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावर या सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. कालपर्यंत २०० फेऱ्या (१०० अप आणि १०० डाऊन मार्गावर) सुरु होत्या. त्यापेकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली व ठाणे या मार्गावर १३० तर हार्बर मार्गावर ७० फेऱ्या सुरु होत्या. आजपासून नव्याने १५० फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ३५० होणार आहे. या सर्व लोकल गाड्या जलद मार्गावरील गाड्यांप्रमाणे फक्त महत्त्वाच्या स्थानकांवरच थांबणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर २०२ फेऱ्या सुरु होत्या. त्यातही वाढ करण्यात आली आहे. आजपासून १४८ नव्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्याही केवळ महत्त्वाच्या स्थानकांवरच थांबवण्यात येणार आहे. या गाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांच्या आधारेच प्रवेश दिला जाणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख