राठोडांचा राजीनामा स्वीकारला; वनविभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवला 

विरोधी पक्षानी संजय राठोड यांच्यावर आगपाखड चालवली आहे.
Accepted Rathore's resignation; The Chief Minister took charge of the forest department
Accepted Rathore's resignation; The Chief Minister took charge of the forest department

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. 28 फेब्रुवारी) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच, वनविभागाचा कार्यभार स्वतःकडे ठेवला. येत्या अधिवेशनात वन विभागाबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्‍नाना वन विभागाचे राज्यमंत्री किंवा मी उत्तर देऊ. अथवा आम्ही सर्वजण आहोत, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने रान उठवले. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढ गेला. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा विरोधकांनी इशारा दिला होता. त्यामुळे रविवारी दुपारी अखेर राठोडांचा राजीनाम घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. 

ते म्हणाले की, राठोड यांनी राजीनामा दिला. तो काय फ्रेम करण्यासाठी दिलेला नसतो, तो आम्ही स्वीकारलाच आहे. तुम्हाला काय वाटतंय की राजीनामा दिला म्हणजे तो काय मी फ्रेम करून ठेवू का? विरोधी पक्षानी संजय राठोड यांच्यावर जी आगपाखड चालवली आहे. त्यामुळे वाटतंय की न्यायालय कशाला हवीत तुम्हीच निर्णय आणि काही ते ठरवा. तपास करा अथवा न करा पण ठोकाच हे विरोधी पक्षाचे वागणे चुकीचे आहे. 

चौकशी अहवालात संजय राठोड निर्दोष निष्पन्न झाले तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेणार का? या प्रश्‍नावर ठाकरे म्हणाले की, तपासाचा अहवाल येऊ द्या. पण, विरोधी पक्षाचा त्यावर विश्‍वास नसावा. यंत्रणांवर त्यांचा विश्‍वास नसेल, त्यामुळेच त्यांनी यंत्रणेला खोटे ठरवून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, या प्रकरणाता तपासाचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पोलिसांकडे ते दिले पाहिजेत. पूजाचे आईवडील व बहिण मला भेटले. त्यांनी मला एक पत्रही दिले आहे. पूजाचे आईवडील म्हणतात या प्रकरणात राजकारण आणू नका आणि विरोधी पक्ष या प्रकरणात राजकारण करत आहे. चौकशीत जे दोषी आढळतील, ते कितीही मोठे असले तरी कारवाई होईलच, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी दिला. 

पूजा चव्हाण यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तक्रार केली आहे. त्याबद्दल त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच, पूजा चव्हाण हिच्या बदनामीबद्दलही संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com