राज्यात ४८ तासांत ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण - In 48 hours, 352 policemen were infected with corona in the state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

राज्यात ४८ तासांत ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 27 जुलै 2020

राज्यात गेल्या ४८ तासांत तब्बल ३५२ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आठ हजार ५८४ वर पोचली आहे. त्यात ८९२ अधिकारी व सात हजार ६९२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्य पोलिस दलातील सहा हजार ५३८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 

मुंबई : राज्यात गेल्या ४८ तासांत तब्बल ३५२ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आठ हजार ५८४ वर पोचली आहे. त्यात ८९२ अधिकारी व सात हजार ६९२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्य पोलिस दलातील सहा हजार ५३८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 

महाराष्ट्र पोलिस दलात सध्या १९५२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यात २२० अधिकारी आणि एक हजार ७३२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; तर राज्यात ९४ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिस दलात २४ जुलै ते २९ जुलै या कालावधीत पोलिसांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. 

प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोरोना आरोग्य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्ताच्या कर्तव्यावरदेखील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. अशा पोलिस कर्मचाऱ्यांचीही ‘अँटीजेन किट’द्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. ता. २४ जुलै रोजी मुंबई पोलिस दलातील एक हजार ५२५ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली, त्यात ३१ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

धारावीत आढळले ९ नवे रुग्ण

धारावीत सध्या केवळ ११४ सक्रिय रुग्ण आहेत; तर आज नऊ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २,५४० एवढी झाली आहे. मुंबई शहराच्या उत्तर विभागातील कोरोनाबाधितांच्या ५४ रुग्णांची भर पडली असून विभागाची रुग्णसंख्याही ५, ८०८ वर पोचली आहे.

धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असली, तरी दादरमध्ये रुग्ण संख्येत किंचितशी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने दादर-माहीम परिसरात फीवर कॅम्प सुरू केले आहेत. त्या माध्यमातून अधिक रुग्ण सापडत असलेल्या परिसरात आणि इमारतींमध्ये रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २९ ठिकाणी फीवर कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. यातून या परिसरातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दादरमध्ये आज २९ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही १,६४७ इतकी झाली आहे; तर ४६७ सक्रिय रुग्ण आहेत. माहीममध्ये आज १६ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १६२१ इतकी झाली असून आज मृत्यूची नोंद झाली नाही. येथे २२० सक्रिय रुग्ण आहेत.

Edited By Vijay Dudhale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख