‘Maha Career Portal’ for students, an appeal to take advantage of career choices | Sarkarnama

विद्यार्थांसाठी ‘महा करिअर पोर्टल’, करिअर निवडीसाठी लाभ घेण्याचे आवाहन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

हे करिअर पोर्टल www.mahacareerportal.com वर उपलब्ध आहे. 

मुंबई : करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल.

या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
 
राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून दहा हजार जण उपस्थित होते. 

अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. हे करिअर पोर्टल www.mahacareerportal.com वर उपलब्ध आहे. 

असे आहे पोर्टल 
६६ लाख 
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 

५५६ अभ्यासक्रम 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम 

२१००० 
व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती 

कोट 
विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो, संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले आहे. 
टेरी डुरीयन, युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रमुख 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख