शाब्बास! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलं मुंबई-पुण्याचं कौतुक...काय आहे दोन्ही शहरांचं मॅाडेल?

नुकतीचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्य सरकारची पाठ थोपटली आहे.
Union Health Ministry lauded the efforts of Mumbai pune to control covid19
Union Health Ministry lauded the efforts of Mumbai pune to control covid19

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असून नागरिकांना चाचण्या, उपचारांसह इतर सोयी-सुविधा देण्यात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळं नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही राज्य सरकारची पाठ थोपटली आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही मुंबई व पुण्यामध्ये करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब केलं आहे. (Union Health Ministry lauded the efforts of Mumbai Pune to control covid19)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुंबई व पुण्याचा उल्लेख करत कौतुक केलं. मुंबईमध्ये प्रत्येक वॅार्ड स्तरावर करण्यात आलेला नियंत्रण कक्ष, प्रत्येक प्रक्रियेचे विकेंद्रीकरण अन् त्यामुळे रुग्णांना बेड मिळवण्यासाठी झालेला फायदा याचा अगरवाल यांना प्रामुख्याने उल्लेख केला.

मुंबईत नियंत्रण कक्ष ठरले निर्णायक

मुंबई २४ नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. त्यामध्ये केवळ टेलिफोन अॅापरेटर नसून डॅाक्टर, इतर वैद्यकीय कर्मचारी असून ते रुग्णवाहिकांमध्ये समन्वय राखत आहेत. रुग्ण किंवा नातेवाईकांशी संवाद साधून ते रुग्णालयात भरती होण्याची गरज आहे किंवा नाही, याचा निर्णय घेत त्यांना मदत करतात. चाचण्यांचे अहवाल प्रशासनासह रुग्णांना पाठवत त्यांना मार्गदर्शन करतात. यामुळे लोकांमधील भीती कमी झाली. 

मुंबईतील कोरोना नियंत्रणात राखण्यात २४ तास कार्यरत असलेली वॅार रुम, जम्बो रुग्णालये आणि अॅाक्सीजन व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. तसेच रुग्णालयांमधील बेडची उपलब्धता, रुग्णवाहिकांचे ट्रॅकिंग आणि रुग्णांना गरजेनुसार बेड उपलब्ध होत असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला नाही, असेही अगरवाल यांनी आवर्जुन सांगितले. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई मॅाडेलचे कौतुक केलं आहे. 

पुणेकरांनी पाळले नियम

केंद्र सरकारने सर्व राज्यांना कंटेन्मेंट झोनबाबत सुचना दिल्या आहेत. पुण्यामध्ये या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याने पॅाझिटिव्हिटी दर कमी होऊन रुग्णसंख्या घटल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यापूर्वी पॅाझिटिव्हिटी रेट ४१.८ टक्के होता. हा दर आता २३.४ पर्यंत खाली घसरला आहे. तसेच रुग्णसंख्याही आता कमी होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी या उपाययोजना परिणामकारक ठरल्या आहेत. मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातून रुग्ण कमी होत असल्याचे चित्र आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com