उद्धव ठाकरे म्हणतात, "" बऱ्याच दिवसांनी तोंडावरचा मास्क काढून बोलत आहे !''  - Uddhav Thackeray says, "He has been taking off his face mask for many days now!" | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे म्हणतात, "" बऱ्याच दिवसांनी तोंडावरचा मास्क काढून बोलत आहे !'' 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

रुग्णवाहिका वाटपाच्या एका कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नवी मुंबईत आले होते

मुंबई: शिवसैनिकांची ओळख म्हणजे कुठल्याही संकटाला झोकून जायचे आणि रुग्णवाहिका सेवा देणे हे शिवसेनेचे काम आहे. या रुग्णवाहिका अत्याधुनिक आहेत. या रुग्णवाहिकेत कोव्हिड-19 रुग्ण नेत असला, तरी त्यातून कोव्हिड-19 होणार नाही अशी काळजी घेतली गेली, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. 

रूग्णवाहिका वाटप हे शिवसेनेचा प्रारंभी पासूनचा उपक्रम आहे. शिवसेनेचे तत्कालिन नेते गणेश नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वयाला जितके वर्षे होतील तितक्‍या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती.

रुग्णवाहिका वाटपाच्या एका कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नवी मुंबईत आले होते. पुढे नाईक हे कॉंग्रेसमध्ये गेले. मात्र मध्यतंरी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुग्णवाहिकेचे वाटत केले आहे. रुग्णांची सेवा हे शिवसेनेने सुरू केलेले अभियान हे आजही सुरू आहे. 

उद्धव ठाकरेयांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या. एकता मंच तसेच चैतन्य ओंकार ट्रस्ट यांच्या सहकार्याने 13 रुग्णवाहिकांचे, तर जाणीव ट्रस्ट तर्फे 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, की बऱ्याच दिवसानंतर तोंडावरचा मास्क काढून बोलत आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी काम करतो, तो शिवसैनिक. रुग्णवाहिकेने मदत ही शिवसेनेची ओळख. ज्या परिस्थितीतून जातोय त्याचा अभ्यास करुन या रुग्णवाहिका बनवल्या आहेत, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत आज त्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्‍सिजनची मात्रा कमी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्‍सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख