ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, गिरीश महाजन 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नारायण राणे यांनी केली होती, त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात रस नाही. सध्या कोरोनाचे रुग्ण वाचले पाहिजे, ते अधिक वाढायला नको यासाठी आम्ही शासन, प्रशासनाला जागे करण्यासाठी निवेदन दिले आहे.
ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, गिरीश महाजन 

जळगाव : नाशिक, मालेगाव आणि जळगासह राज्यात कोरोना बाधितांचा अहवाल येण्यास तीन ते सात दिवसांचा वेळ लागतो. यामुळेच जळगावसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. राज्य सरकारपूर्ण अपयशी ठरले आहे. राज्यात "कोरोना'बाधीतांची संख्या कमी होण्याची गरज आहे. 

राज्यात हाच मोठा महत्वाचा प्रश्‍न आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात भाजपला कोणताही रस नाही, असे मत राज्याचे मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना बोलतांना व्यक्त केले. 

जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर तेपत्रकारांशी बोलत होते. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष सुनील सूर्यवंशी, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, स्मिता वाघ, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते. 

महाजन म्हणाले, की जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मृत झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेस असंख्य नागरिक उपस्थित राहतात. यामुळेही रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्ण मृत झाल्यानंतर मोजक्‍या नातेवाइकांसमवेतच अंत्यसंस्कार करण्याची सक्ती प्रशासनाने करायला हवी. 

शासनाला, जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगतो कोरोना अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळा वाढवा, खासगी चाचणीला परवानगी द्या. जेणे करून लवकर अहवाल येऊन रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्‍य होतील. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

शेतकऱ्यांची थट्टा सुरू 
राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कोरोनाचे निमित्त करून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही. शेतकऱ्यांची थट्‌टा शासनाने चालविली आहे. शासनाला चार वेळा पत्र पाठविले एकाही पत्राचे उत्तर दिलेले नाही. जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर आहे. "डीन'ची बदली केलीच कशी? नवीन डीन अजून रुजू झाले नाही. रुग्णांच्या जिवाशी खेळ चालविला असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com