28 हजार पुणेकरांना न्यायालयात नेणार? : गृहमंत्री म्हणाले.... - To take 28,000 Punekars to court? : Home Minister said .... | Politics Marathi News - Sarkarnama

28 हजार पुणेकरांना न्यायालयात नेणार? : गृहमंत्री म्हणाले....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आता कलम १८८ च्या नोटीसा येत आहेत.  लॉकडाऊनच्या काळात असलेल्या कामाच्या ताणामुळे पोलीसांनी केवळ नावे लिहून घेतली होती.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आता कलम १८८ च्या नोटीसा येत आहेत.  लॉकडाऊनच्या काळात असलेल्या कामाच्या ताणामुळे पोलीसांनी केवळ नावे लिहून घेतली होती. आता नागरिकांना नोटीसा येत असल्यामुळे कायदेशिर कारवाईची भीती निर्माण झाली आहे. 

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख, विनोद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन नागरिकांवर होत, असलेली कारवाई मागे घेण्याची विनंती करणारे निवेदन दिले. त्यावर गृह विभागाशी चर्चा करत आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही. याची पूर्ण काळजी घेऊ, असे आश्वासन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. 

यावेळी प्रदीप देशमुख म्हणाले, रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलीसांनी समज देऊन त्यांची नावे लिहून घेतली होती. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम १८८ नुसार कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात येत आहे. यातील अनेक नागरिक काही निकडीच्या कामासाठीही घराबाहेर पडले होते. त्या काळात असलेल्या कामाच्या ताणामुळे पोलीसांनी केवळ नावे लिहून घेतली. 

आता त्यांना नोटीसा येत असल्यामुळे कायदेशीर कारवाईची भीती निर्माण झाली आहे. एकट्या पुणे शहरातच असे २८ हजारांवर नागरिक आहेत. राज्याचा विचार केला. तर हा आकडा काही लाखांत आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन कलम १८८ नुसार पाठविण्यात आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणी गृह मंत्र्यांकडे केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई  

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानामुळे नियमीत चर्चेत असणाऱ्या कंगनावर टि्वटरने तात्पुरते निर्बंध घातले आहेत. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करत असल्यामुळे कंगनावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चिडलेल्या कंगनाने थेट धमकीच दिली असून तिच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना तुमचं जगणं अवघड करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. 

 ट्विटरने सध्या आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेते झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. तीच वेळ ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ओढवली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावरच निशाना साधला आहे. 

 Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख